मक्याला तूर्त जीवदान; खरिपाच्या आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 01:03 AM2019-07-24T01:03:19+5:302019-07-24T01:03:25+5:30
पावसामुळे मोड फुटण्याच्या तयारीत आलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला असून, काही तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे मक्यावर प्रादुर्भाव केलेल्या लष्करी अळ्यांचा नायनाट करण्यास हा पाऊस फायदेशीर ठरला आहे.
नाशिक : पावसामुळे मोड फुटण्याच्या तयारीत आलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला असून, काही तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे मक्यावर प्रादुर्भाव केलेल्या लष्करी अळ्यांचा नायनाट करण्यास हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने पेरण्यांचा खोळंबा कायम असून, पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यांमध्ये मात्र पेरण्यांचा वेग कमी आहे.
जून महिना कोरडा गेल्यावर मान्सूनने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात हजेरी लावली. सिन्नर, येवला, चांदवड, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व दिंडोरी तालुक्याला झोडपून काढणाºया या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली.
पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकला अधूनमधून पाऊस कायम असला तरी, तेथील भात पिकासाठी तो पुरेसा नसल्यामुळे पेठ, इगतपुरी, सुरगाणा व इगतपुरी तालुक्यात १० ते ३० टक्केच पेरण्या होऊ शकल्या आहेत. येवला, मालेगाव, नांदगाव, सिन्नर या दुष्काळी तालुक्यात पहिल्याच पावसाने शेतकºयांच्या आशा पल्लवित होऊन त्यांनी सरासरी ८० टक्के पेरण्या पूर्ण केल्या, परंतु पावसाच्या किमान दहा, बारा दिवसांच्या दडीमुळे तेथील पिके धोक्यात आली होती. जमिनीखालून मोड आलेल्या पिकांना पाण्याची गरज असताना उलट उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकºयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. मात्र गेल्या शनिवार, रविवारपासून सलग दोन दिवस पावसाने पुन्हा हजेरी दिल्यामुळे या पिकांना तूर्त जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे अपुºया राहिलेल्या पेरण्या पूर्ण होणार असल्या तरी, अजूनही शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जवळपास सर्वच पेरण्या आटोपल्या होत्या. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. यंदा मात्र पावसाच्या आगमनावर पेरण्या पुढे सरकत असून, ६० टक्क्यावर थांबलेल्या पेरण्या गेल्या दोन दिवसांपासून वाढल्या आहेत. विशेष करून भात लागवडीला वेग आला असून, गेल्या आठवड्यात जेमतेम २८ टक्के भात लागवड झाली होती, ती आता ६० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. मका व बाजरीची पेरणी जवळपास आटोपली आहे.
पावसामुळे लष्करी अळी नष्ट
जिल्ह्णात मक्यावर लष्करी अळीने केलेल्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांसमोर मोठे संकट उभे ठाकले असून, लष्करी अळीने पीक उद्ध्वस्त केल्यामुळे अनेक शेतकºयांनी शेतात पुन्हा ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट केले. परंतु कृषी खात्याच्या म्हणण्यानुसार गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या फटक्यामुळे मक्यावरील लष्करी अळींचा नायनाट होण्यास मदत झाली आहे. मक्याच्या पानांमध्ये, देठांवर असलेल्या अळ्यांना पावसाच्या पाण्यापासून धोका असून, त्यामुळे त्यांचा नायनाट व संक्रमण रोखले जाते.
अशा झाल्या पेरण्या
जिल्ह्णात खरिपाचे पाच लाख ७५ हजार ५८८ इतके लागवडीचे क्षेत्र असून, त्यापैकी तीन लाख ४४ हजार ९०१ हेक्टरवर म्हणजे ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वाधिक पेरण्या दुष्काळी म्हणून गणल्या गेलेल्या येवला तालुक्यात १११ टक्के झाल्या आहेत. अन्य तालुक्यात पुढीलप्रमाणे पेरण्या करण्यात आल्या आहेत. (टक्केवारीनुसार)
* मालेगाव- ८५
* बागलाण- ३७
* कळवण- ६०
* देवळा- ६३
* नांदगाव- ८६
* सुरगाणा- २५
* नाशिक- ४
* त्र्यंबक- ५६
* दिंडोरी- ११
* इगतपुरी- २१
* पेठ- ९
* निफाड- ३८
* सिन्नर- ६९
* येवला- १११
* चांदवड- ५८