रिपरिप पावसाने खरीप पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:55 PM2017-08-20T22:55:21+5:302017-08-21T00:22:04+5:30
शनिवारी सायंकाळपासून काटवन परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. यामुळे तग धरून उभ्या असलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. पिकांची निंदणी झाल्यानंतर वडनेरसह परिसरात पाऊस झाला नाही. परिणामी पिकांनी माना टाकायला सुरुवात केली गेली. बागायतदार शेतकºयांनी विद्युत मोटारीद्वारे पाणी देणे सुरू केले होते, तर कोरडवाहू शेतकºयांची वाताहत झाली होती. सुमारे दोन-तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पाऊस सक्रिय झाल्याने तग धरुन असलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे.
वडनेर खाकुर्डी : शनिवारी सायंकाळपासून काटवन परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. यामुळे तग धरून उभ्या असलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. पिकांची निंदणी झाल्यानंतर वडनेरसह परिसरात पाऊस झाला नाही. परिणामी पिकांनी माना टाकायला सुरुवात केली गेली. बागायतदार शेतकºयांनी विद्युत मोटारीद्वारे पाणी देणे सुरू केले होते, तर कोरडवाहू शेतकºयांची वाताहत झाली होती. सुमारे दोन-तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पाऊस सक्रिय झाल्याने तग धरुन असलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे.
यंदा सुरुवातीपासूनच चांगल्या पर्जन्यमानाची शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र पावसाची सुरुवात जोराणे झाली तर मध्यंतरी पावसाने ओढ दिली. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरू झालेल्या रिपरिप पावसाने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या पिकांच्या वाढीसाठी पावसाची नितांत गरज भासत आहे. शेतकºयांकडून विहिरीद्वारे पाणी दिले जात असले तरी पावसाच्या पाण्यावर पिकांची खरी वाढ होत असते. गेल्या चार ते पाच वर्षांच्या सातत्याच्या दुष्काळानंतर गेल्या वर्षभरापासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पिके चांगली येतील अशी आशा शेतकºयांनी बाळगत मोठ्या प्रमाणात परिसरात मका, बाजरी यांची पेरणी केली होती. पिकांच्या पोषकतेसाठी पावसाची गरज असताना पावसाने दडी मारल्याने बळीराजाचा चिंतेत होते. पावसाने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या. जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.