श्वानांच्या हल्ल्यातून हरणाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 04:07 PM2019-07-04T16:07:09+5:302019-07-04T16:08:29+5:30

जळगाव नेऊर : धुळगाव येथील अनकाई रोडलगत भगवंत पाटील यांच्या शेतात भटकंती करणाऱ्या हरणावर भटक्या श्वानांनी हल्ला करून त्याला जखमी केले. मात्र वस्तीतील काही नागरिकांनी श्वानांच्या तावडीतून हरणाला सोडवून त्याचे प्राण वाचविले.

Livelihoods | श्वानांच्या हल्ल्यातून हरणाला जीवदान

श्वानांच्या हल्ल्यातून हरणाला जीवदान

Next

जळगाव नेऊर : धुळगाव येथील अनकाई रोडलगत भगवंत पाटील यांच्या शेतात भटकंती करणाऱ्या हरणावर भटक्या श्वानांनी हल्ला करून त्याला जखमी केले. मात्र वस्तीतील काही नागरिकांनी श्वानांच्या तावडीतून हरणाला सोडवून त्याचे प्राण वाचविले. मानवतेचे दर्शन घडविणारी ही घटना गुरु वारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली.
अन्नपाण्यासाठी आसुसलेले हरीण भगवंत पाटील यांच्या शेतात शिरले. त्याच्यावर भटक्या श्वानांनी हल्ला करून त्याला जखमी केले. अर्जुन गायकवाड, विलास पाटील, बाळासाहेब खोडके व इतर ग्रामस्थांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत कुत्र्यांच्या तावडीतून त्याची सुटका केली. धुळगावपासून आठ ते दहा किमी अंतरावर असलेल्या नांदूर-सावरगावलगत वनविभागाचे मोठे जंगल आहे. त्यात हरीण, मोर यांसह इतर वन्य पशुपक्षी मोठ्या प्रमाणात आहे. जंगलात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे अन्नपाण्यासाठी वन्यजीव अन्नपाण्याच्या शोधात मानव वस्तीकडे येत आहेत. त्यातच हे हरीण अनकाई रोडवर पाटील यांच्या शेतात भटकत असताना कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी ते सैरावैरा पळत होते. मात्र श्वानांनी त्याचे लचके तोडण्यास सुरु वात केली. सुदैवाने ग्रामस्थांनी सुटका करून प्राण वाचविले. वनविभागाशी संपर्क साधत डॉ. बाऊस्कर यांनी जखमी हरणावर उपचार केले. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनरक्षक प्रसाद पाटील, गोपाळ हरगावकर, विकास देशमुख, सागर देशमुख यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी सुनील पाटील, पांडुरंग शेळके, प्रल्हाद मोरे, मनीष पाटील, दीपक खोडके, राजेंद्र खोडके, सम्राज्ञी पाटील, भार्गवी पाटील, वरद पाटील यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Livelihoods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक