३० फूट खोल विहिरीत पडलेल्या मांजरीला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:49 PM2018-04-09T14:49:41+5:302018-04-09T14:49:41+5:30

पिंपळगाव बसवंत - सुमारे तीस फुट खोलीच्या जुन्या आडात पडलेल्या मांजरीला अग्निशामक दलाने दोन तास प्रयत्न करत जीवदान दिले. पिंपळगाव बसवंत येथील माळी गल्ली येथील मोरे वाड्यात जुना आड आहे.

Lives in the 30-foot-deep well in the well | ३० फूट खोल विहिरीत पडलेल्या मांजरीला जीवदान

३० फूट खोल विहिरीत पडलेल्या मांजरीला जीवदान

Next

पिंपळगाव बसवंत - सुमारे तीस फुट खोलीच्या जुन्या आडात पडलेल्या मांजरीला अग्निशामक दलाने दोन तास प्रयत्न करत जीवदान दिले. पिंपळगाव बसवंत येथील माळी गल्ली येथील मोरे वाड्यात जुना आड आहे. ईमारत पुर्णपणे पडलेली आहे. सकाळी दहा वाजता भानुदास विठ्ठल बोराडे यांची किमो नावाची मांजर भक्ष शोधता शोधता विहिरीत पडली. अग्निशामक दलाला फोन करून बोराटे कुटुंब मांजराला वाचविण्यासाठी प्रयत्न करत होते. अग्निशामक दलाने तातडीने दखल घेत सर्व टिम हजर झाली. आड हा जुन्या पद्धतीचा असल्यामुळे व सुमारे तीस फुट खोल व अरूंद असल्यामुळे मोठे आव्हान उभे होते. परंतु अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने अखेर दोन तासाच्या प्रयत्नाने मांजरीला बाहेर काढण्यात यश मिळविले. स्नेहा या मुलीने हाक मारताच तिच्या अंगावर मांजरीने उडी घेताच स्नेहाला आनंदाश्रू आवरता आले नाही. यावेळी बोराटे कुटुंबियांनी अग्निशामक दलाचे आभार मानले. (०९ पिंपळगाव १)

Web Title: Lives in the 30-foot-deep well in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक