सोनेवाडीत गव्हाणी घुबडाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:31 PM2020-03-17T23:31:37+5:302020-03-17T23:34:08+5:30

निफाड : तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथे येथील नितीन दौलतराव निचित यांनी जखमी अवस्थेतील गव्हाणी घुबडाला कावळे व श्वानांच्या हल्ल्यातून वाचवल्याची घटना घडली आहे.

Lives of wheat in the gold fields | सोनेवाडीत गव्हाणी घुबडाला जीवदान

सोनेवाडीत गव्हाणी घुबडाला जीवदान

Next
ठळक मुद्देजखमी घुबडाला आपल्या ताब्यात घेतले.

निफाड : तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथे येथील नितीन दौलतराव निचित यांनी जखमी अवस्थेतील गव्हाणी घुबडाला कावळे व श्वानांच्या हल्ल्यातून वाचवल्याची घटना घडली आहे.
निचित हे शेतातून जात असताना त्यांना जखमी अवस्थेतील गव्हाणी घुबडावर कावळे व श्वान हल्ला करीत असल्याचे लक्षात येताच त्यांनी कावळे व श्वानांना हुसकावत जखमी घुबडाला आपल्या ताब्यात घेतले. जखमी घुबडाला घेऊन ते निफाड येथे पक्षिमित्र दवाखान्यात आले. डेर्ले यांनी या जखमी पक्ष्यांची तपासणी करत उपचार सुरू केले.घुबडाच्या पंखांना जखम झाली असल्याने ते उडू शकत नव्हते. त्याचे वजन फारच कमी झाले असल्याने त्याला डिहाड्रेशन झाल्याचे लक्षात आले. त्यास शिकार न मिळाल्याने अशक्तपणा आलेला दिसून आला. सध्या डॉ. डेर्ले घुबडावर उपचार करीत आहे. जर त्याने अन्न घेतले व त्यास बरे वाटले तर त्यास निसर्गाच्या अधिवासात सोडण्यात येणार आहे. हे घुबड निशाचर आहे, असे डेर्ले यांनी सांगितले.

Web Title: Lives of wheat in the gold fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.