नांदगाव तालुक्यात पशुधन संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 10:56 PM2020-01-23T22:56:40+5:302020-01-24T00:36:21+5:30

शेतकरी विविध संकटांशी सामना करीत असताना आता राबती व दुभती जनावरे चोरीचे प्रमाण वाढल्याने पशुधन आले आहे. तालुक्यात पाळीव प्राण्याचे चोरीचे प्रकार वाढीस लागले असून, मांडवड, हिसवळ बु., हिसवळ खु., लक्ष्मीनगर आदी दुर्गम भागातील बैल व दुभती जनावर चोरीस जात असून, पशुपालक धास्तावले आहेत.

Livestock crisis in Nandgaon taluka | नांदगाव तालुक्यात पशुधन संकटात

नांदगाव तालुक्यात पशुधन संकटात

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी संतप्त : चोऱ्यांचे प्रमाण वाढले

नांदगाव : तालुक्यातील शेतकरी विविध संकटांशी सामना करीत असताना आता राबती व दुभती जनावरे चोरीचे प्रमाण वाढल्याने पशुधन आले आहे. तालुक्यात पाळीव प्राण्याचे चोरीचे प्रकार वाढीस लागले असून, मांडवड, हिसवळ बु., हिसवळ खु., लक्ष्मीनगर आदी दुर्गम भागातील बैल व दुभती जनावर चोरीस जात असून, पशुपालक धास्तावले आहेत.
तालुक्यातील हिसवळ येथील अण्णा बिन्नर यांची दोन जनावरे, एक बैल व एक दुभती गाय, नामदेव बोगीर यांची गाभण गाय, श्रावण साळुंके याची गाभण गाय चोरीला गेली आहे. दरम्यान, श्रावण त्र्यंबक बोगीर यांची गाय चोरांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला; पण ग्रामस्थ पाठलाग करू लागल्याने चोर तेथून पसार झाला.
त्यानंतर हिसवळ बु लोहमार्गा-लगतच्या रहिवाशांनी चोरांच्या भीतीने रात्र जागून काढली. अनेक जनावरे चोरीला गेली आहेत, असे शेतकरी सांगतात. जनावरांना चोरून त्याची वाहतूक छोटा हत्ती या गाडीत टाकून केली जाते, अशी माहिती
आहे. माझ्या शेतात शेडमध्ये बांधलेला बैल, दुभती गावरान गाय चोरी गेली. तिच्या वासरांना दूध कसे पाजू, असे सांगताना बिन्नर यांच्या डोळ्यातून अश्रू आले.

Web Title: Livestock crisis in Nandgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.