राहतात नाशिकमध्ये लायसन्स काढले परदेशाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:34+5:302021-07-15T04:11:34+5:30

पंचवटी- वाहन चालविण्यासाठी आपल्याकडे बऱ्याचदा लायसन्स नसले तरी विदेशात मात्र तसे नाही. नियमांचे पालन आवश्यक, तसेच नियमांचे पालन केले ...

Living in Nashik, license issued to foreigners! | राहतात नाशिकमध्ये लायसन्स काढले परदेशाचे!

राहतात नाशिकमध्ये लायसन्स काढले परदेशाचे!

Next

पंचवटी- वाहन चालविण्यासाठी आपल्याकडे बऱ्याचदा लायसन्स नसले तरी विदेशात मात्र तसे नाही. नियमांचे पालन आवश्यक, तसेच नियमांचे पालन केले नाही तर जबरी दंडही भरावा लागतो. त्यामुळे विदेशात शिक्षण किंवा कामानिमित्त जाणाऱ्या अनेकांनी नाशिकमध्ये राहूनही विदेशात वाहन चालविण्याचा परवाना अथवा लायसन्स काढले आहे. जग आता ग्लोबल व्हिलेज बनल्याने नाशिकमधून हजारो युवक ज्ञानदानासाठी, तर अनेक जण नोकरी व्यवसायासाठीदेखील वेगवेगळ्या देशांमध्ये जातात. वाहन चालविण्यासाठी परवाना आवश्यक असतो आणि कित्येक वेळा तो पुरावा म्हणून वापरता येत असला तरी आपल्याकडे वाहन चालविण्याचा परवाना काढलाच जातो आणि तो जवळ बाळगून वापरला जातो असे नाही. त्यामुळे अनेकदा वाहतूक पोलिसांचे फावते; परंतु विदेशात तसे नसते. वाहन चालविण्यासाठी परवाना जवळ नसेल तर मोठा दंड भरावा लागतो. याशिवाय परवाना काढताना तेथील पद्धती आणि काही वेळा नियमदेखील वेगवेगळे असल्याने सध्या तरी येथूनच लायसन्स काढून घेण्यावर भर दिला जातो. नाशिकमध्ये चार वर्षांत बाराशे नागरिकांनी इंटरनॅशनल लायसन्स काढल्याची आरटीओकडे नोंद आहे.

इन्फो.. मुदत एक वर्षाचीच

- विदेशातच शिक्षण किंवा नोकरीसाठी गेलेल्या युवक किंवा नागरिकांना स्वत:चे वाहन चालविण्यासाठी परवाना आवश्यक असतो.

- अनेक जण स्वत:चे वाहन विदेशात घेऊन जातात. त्यांना वाहन इंटरनॅशनल वाहन परवाना आवश्यक असतो.

- विदेशात स्वत:च्या मालकीचे वाहन नसले तरी भाड्यानेदेखील वाहने मिळतात. त्यामुळे विदेशात जाणारे युवक आणि नागरिक हमखास लायसन्स काढतात.

- परदेशी लायसन्स काढण्याचे शुल्क एक हजार रुपये आहे.

- स्थानिक लायसन्सप्रमाणे त्याची मुदत नसते तर केवळ एक वर्षासाठीच ते दिले जाते.

- विदेशातून जाऊन आल्यानंतर पुन्हा त्याला पुन्हा त्या व्यक्तीला जायचे असेल तर पुन्हा परवाना काढावा लागतो.

इन्फो... तुम्हालाही काढायचे आहे इंटरनॅशनल लायसन्स?

- तुम्हाला इंटरनॅशनल लायसन्स काढायचे असेल तर त्यासाठी अगोदर स्वत:चा वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक असतो.

- तुमच्याकडे असलेल्या सध्याच्या वाहनाच्या संवर्गातील वाहन परवाना काढता येईल.

- लायसन्स काढण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो.

- असे लायसन्स काढण्यासाठी पासपोर्ट व्हिसा अशा प्रकारची कागदपत्रे आवश्यक ठरतात

- लायसन्स काढण्यासाठी साधारणत: एक हजार रुपयांचा खर्च येतो.

- वाहन चालविण्याचा परवाना मॅन्युअल असतो.

इन्फो..

वर्ष- २०१७ २३५

वर्ष- २०१८ ४१०

वर्ष- २०१९ ४६६

वर्ष- २०२० १०३

वर्ष २०२१ ६६

Web Title: Living in Nashik, license issued to foreigners!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.