कर्जमाफीचे जिल्हा बँकेला दीड हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:19 AM2017-08-30T01:19:46+5:302017-08-30T01:19:51+5:30

राज्य शासनाने दीड लाखाच्या आतील व दीड लाखापर्यंतच्या शेतकरी कर्जदारांना दिलेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे थकबाकीदार असलेल्या १ लाख २४ हजार ३०८ शेतकरी सभासदांना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या सव्वा लाख शेतकºयांचे १५०२ कोटी रुपयेही जिल्हा बॅँकेला शासनाकडून प्राप्त होणार आहे.

 Loan amount to the district bank of one and a half thousand crores | कर्जमाफीचे जिल्हा बँकेला दीड हजार कोटी

कर्जमाफीचे जिल्हा बँकेला दीड हजार कोटी

Next

नाशिक : राज्य शासनाने दीड लाखाच्या आतील व दीड लाखापर्यंतच्या शेतकरी कर्जदारांना दिलेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे थकबाकीदार असलेल्या १ लाख २४ हजार ३०८ शेतकरी सभासदांना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या सव्वा लाख शेतकºयांचे १५०२ कोटी रुपयेही जिल्हा बॅँकेला शासनाकडून प्राप्त होणार आहे. शासनाने नुकतीच दीड लाखाच्या आत ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या सभासदांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली. त्यानुसार बॅँकेकडून दीड लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या ९० हजार ९३१ शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे.
या ९० हजार ९३१ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटीची रक्कम ६८६ कोटी रूपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा होणार आहे. तसेच दीड लाखांपेक्षा जास्त मात्र दीड लाखापर्यंत कर्जमाफीच्या लाभास पात्र असलेल्या ३३ हजार ३७७ शेतकºयांचे ८१६ कोटी रुपयेही जिल्हा बॅँकेत जमा होणार आहे. मात्र त्यासाठी या ३३ हजार ३७७ शेतकºयांना त्यांच्याकडील दीड लाखांपुढील कर्जाची थकबाकीची रक्कम सुमारे ३१६ कोटी रुपये आधी जिल्हा बॅँकेत जमा करावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना कर्जमाफीची ५०० कोटींची रक्कम मिळणार आहे. जिल्हा बॅँकेकडील दीड लाखांच्या आतील ९० हजार ९३१ शेतकरी व दीड लाखांच्या पुढील मात्र दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीच्या लाभास पात्र असलेले ३३ हजार ३७७ शेतकरी असे एकूण १ लाख २४ हजार ३०८ शेतकºयांना एकूण दीड लाखांपर्यंतची सुमारे १५०२ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. आॅक्टोबर २०१७ पासून ही कर्जमाफीची रक्कम राज्य शासनाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कर्जमाफीची एकरकमी रक्कम जिल्हा बॅँकेला मिळणार असल्याने जिल्हा बॅँकेच्या आर्थिक स्थिरतेला बळ मिळणार आहे.
‘दीड लाखांच्या पुढे थकबाकीदार असलेल्या मात्र दीड लाखांपर्यंतची कर्जमाफीस पात्र असलेल्या ३३ हजार ३७७ शेतकºयांनी त्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांची दीड लाखांपुढील सुमारे ३१६ कोटींची रक्कम आधी जिल्हा बॅँकेत जमा करणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यांना दीड लाखांपर्यंतच्या सुमारे ५०० कोटींच्या कर्जमाफी रकमेचा लाभ मिळेल. त्यासाठी शेतकरी बांधवांनी त्यांच्याकडील दीड लाखांपुढील रक्कम तातडीने भरावी.’
- राजेंद्र बकाल, कार्यकारी संचालक, जिल्हा बॅँक.

Web Title:  Loan amount to the district bank of one and a half thousand crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.