वणीत लसीकरण मोहिमेत स्थानिक वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 11:44 PM2021-05-08T23:44:33+5:302021-05-09T00:17:41+5:30
वणी : गावातील केंद्रांवर १८ ते ४५ वयोगटासाठी पहिला डोस व ज्येष्ठांसाठी दुसऱ्या डोसच्या लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते; परंतु ऑनलाइन नोंदणी असल्याने वणीबाहेरील बहुसंख्य नागरिक, महिला, वृद्ध यांच्या कुटुंबीयांनी सदर प्रक्रिया पूर्ण करून लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला. त्यामुळे स्थानिक नागरिक वंचित राहिले आहेत.

आदिवासी भागामध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुरेशी माहिती नसल्याने स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. जागेवर आधार कार्ड नोंदणी व तपासणी करून स्थानिक नागरिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली जात आहे. वणीसाठी प्रथम व दुसरा असे १,२०० डोस आरोग्य विभागाने मोहिमेसाठी उपलब्ध करून दिले आहेत.