दरी ग्रामपंचायतीला पदाधिकाऱ्यांनी ठोकले ताळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 08:30 PM2019-10-11T20:30:23+5:302019-10-11T20:30:40+5:30
दरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विनोद वाघचौरे यांच्या कारभाराबाबत पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या असून, ग्रामपंचातयतीचा संचित निधी,पेसा निधी, सहाव्या वित्त आयोगाचा निधी तसेच इतर निधी बाबत ग्रामसेवकाकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देतात. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे किती निधी जमा आहे
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : नाशिक तालुक्यातील दरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालय तसेच त्यातील दोन कपाटांना ताळे ठोकून सिलबंद करण्यात आले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून ग्रामपंचायतीचे कामकाज त्यामुळे ठप्प झाले असून, प्रशासनाने ग्रामसेवकाची तात्काळ बदली करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विनोद वाघचौरे यांच्या कारभाराबाबत पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या असून, ग्रामपंचातयतीचा संचित निधी,पेसा निधी, सहाव्या वित्त आयोगाचा निधी तसेच इतर निधी बाबत ग्रामसेवकाकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देतात. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे किती निधी जमा आहे याची कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. १ मे व १५ आॅगष्ट रोजी झालेल्या ग्रामसेची व त्यानंतरच्या तीन विशेष ग्रामसभेची प्रोसिडींग अदयाप ग्रामसेवकाने रजिष्टरला नमूद केलेली नाही. ग्रामसभेमधील विषय, समस्या, उपययोजना, प्रश्न अडचणी या देखील नमूद करण्यात आलेल्या नाहीत. मासिक बैठकीचे अहवाल लिहीले जात नसल्याने मर्जीतील लोकांच्या कामाबाबतचे ग्रामसभेवर बेकायदेशीर ठराव घेतले जात असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटार व गावात रस्ते मंजूर असून, ग्रामसेवक परस्पर ठेकेदारांना नेमून काम करीत आहे त्यामुळे गुणवत्तेचे काम होतनाही. मात्र कोणत्याही सदस्य अथवा पदाधिकाºयांना न विचारता कामे केले जात असल्याने अशा ग्रामसेवकाबरोबर काम करणे शक्य नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरी गाव हे आदिवासी पेसा क्षेत्रातील गाव असून,सदर गावाला तीन राष्टÑपती पुरस्कार मिळालेले आहेत. असे असताना ग्रामसेवकाचे मात्र विकास कामे करण्याची मानसिकता दिसत नाही. त्यामुळे सदर ग्रामसेवकाची तात्काळ बदली करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ १ आॅक्टोंबर रोजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी एकत्र येत पोलीस पाटील शिवाजी पिंगळे यांच्या समक्ष पंचनामा करून कार्यालयातील कपाटे सील केले तसेच कार्यालयालाही कुलूप ठोकले असून, ग्रामसेवकाची बदली न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सरपंच अलका गांगोडे, उपसरपंच अॅड. अरूण दोेंदे, सदस्य भाऊराव आचारी, सारिका भोई, अर्जुन भोई, सुनीता बेंडकोळी, शितल पिंगळे, संजना ढेरिंगे , मिना आचारी, भारत पिंगळे यांनी दिला आहे.