पाण्यासाठी तळवाडे ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:11 AM2021-06-18T04:11:21+5:302021-06-18T04:11:21+5:30
महिनाभरापासून पाण्याअभावी गाव तहानलेले मालेगाव : गेल्या महिनाभरापासून गावात पाणी येत नसल्याने संतापलेल्या तळवाडे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून ...
महिनाभरापासून पाण्याअभावी गाव तहानलेले
मालेगाव : गेल्या महिनाभरापासून गावात पाणी येत नसल्याने संतापलेल्या तळवाडे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला. तालुक्यातील तळवाडे येथे ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे. गेल्या ३० दिवसांपासून गावात पाणी येत नाही, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. गावाची जुनी विहीर असून तिच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्या विहिरीचे पाणी वापरण्यायोग्य नाही. गावातील सर्व तरुणांनी यावेळी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून निषेध व्यक्त केला. जोपर्यंत गावाला पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, अशी मागणी करण्यात आली. याबाबत तहसीलदार राजपूत यांना फोन करून माहिती देण्यात आली. पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व जिल्हा परिषद सदस्य समाधान हिरे, पंचायत समिती सदस्य बापू पवार यांना ही माहिती देण्यात आली. यावेळी बंडू कुवर, ग्रामपंचायत सदस्य अनिल शिरोळे, अमोल जगताप, डॉ. वाघ, दीपक शिरोळे, बादल मोरे, नगोरख कुवर, नितीन शिरोळे, मगण शिरोळे, फिरोज शेख, काकाजी शिरोळे, डॉ शिरोळे, निंबा जाधव, ज्ञानेश्वर अहिरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
-------------------
ग्रामसेवकाचे दुर्लक्ष
गावाच्या जवळपास विहीर नसल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. मालेगाव तालुक्याला पाणी पुरवठा करण्यासाठी तळवाडे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो मात्र तळवाडे गावाला पाणी मिळत नाही, ग्रामसेवक कोर यांना वेळोवेळी सांगूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. (१७ मालेगाव २)
===Photopath===
170621\123917nsk_15_17062021_13.jpg
===Caption===
१७ मालेगाव २