दरघसरणीने कांदा चाळीतच ‘लॉकडाउन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:40 PM2020-04-26T23:40:14+5:302020-04-26T23:40:36+5:30
कोरोना विषाणू प्रादुर्भावाने शेतमालाला मोठा फटका बसला असून, उन्हाळ कांद्याचे दर घसरस असल्याने मानोरी, देशमाने, शिरसगाव लौकी, पिंपळगाव लेप, जऊळके, खडकीमाळ, कोटमगाव परिसरात उन्हाळ कांदा चाळीत साठविला जात आहे.
मानोरी : कोरोना विषाणू प्रादुर्भावाने शेतमालाला मोठा फटका बसला असून, उन्हाळ कांद्याचे दर घसरस असल्याने मानोरी, देशमाने, शिरसगाव लौकी, पिंपळगाव लेप, जऊळके, खडकीमाळ, कोटमगाव परिसरात उन्हाळ कांदा चाळीत साठविला जात आहे.
यंदा समाधानकारक पर्जन्यमानाने उन्हाळ कांद्याची लागवड केल्या गेली. दरम्यान, कोरोनाने लॉकडाउन आणि संचारबंदी लागू झाल्याने शेतमाल ही शेतातच लॉकडाउन झाला. परिणामी बाजारपेठा व खरेदीदारांअभावी समाधानकारक भाव मिळत नसल्याने उन्हाळ कांदा चाळीत लॉकडाउन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कांदा साठवणूक करतांनाही कांदा काढणी, नवीन चाळ तयार करणे, जुनी दुरुस्त करणे, कांदा साठवण्यासाठीची मजुरी याचा विचार करता कांदा साठवणुकीवरही शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. कांदा रोप, लागवड व उत्पादन आणि आता साठवणूक या सर्वांवरील झालेला खर्चाचा विचार करता भविष्यात कांद्याला भाव न मिळाल्यास कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडणार असल्याचे चित्र आहे.