लॉकडाउनमुळे धान्य शेतकऱ्यांच्या घरात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 09:25 PM2020-05-22T21:25:38+5:302020-05-22T23:48:26+5:30
रामदास शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : वर्षभर काबाडकष्ट करून शेतकऱ्यांनी शेतात उत्पादित केलेले धान्य कसेबसे मळणी करून घराच्या दारात आणले खरे मात्र लॉकडाउनमुळे बाजारपेठा ठप्प झाल्याने उत्पादित धान शेतक-यांच्या घरातच पडून असून, आदिवासी विकास महामंडळाचे बंद पडलेले एकाधिकार धान्य खरेदी केंद्र सुरू करावेत, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.
पेठ : वर्षभर काबाडकष्ट करून शेतकऱ्यांनी शेतात उत्पादित केलेले धान्य कसेबसे मळणी करून घराच्या दारात आणले खरे मात्र लॉकडाउनमुळे बाजारपेठा ठप्प झाल्याने उत्पादित धान शेतक-यांच्या घरातच पडून असून, आदिवासी विकास महामंडळाचे बंद पडलेले एकाधिकार धान्य खरेदी केंद्र सुरू करावेत, अशी मागणी शेतक-यांकडून होत आहे.
पेठ तालुक्यात बहुतांश शेतकरी दरवर्षी भात, नागली, खुरसणी, वरई आदी धान्य घरी वापरण्याइतपत ठेवून उर्वरित धान्य एकाधिकार धान्य खरेदी केंद्र अथवा खासगी बाजारात शेतकरी विकून टाकतात. त्याच पैशातून खरीप हंगामासाठी आवश्यक खते, बी- बियाणे, औषधे खरेदी करतात. या वर्षी कोरोना व लोक लॉकडाउन यामुळे वाहतूक, आठवडे बाजार व एकाधिकार धान्य खरेदी केंद्र बंद पडली. मजुरांची
टंचाई असतानाही शेतकºयांनी धान्याची मळणी केली असली तरी शेतकºयांकडे स्वत:चे वाहन नसल्याने धान्याची बाजार समित्यांपर्यंत
वाहतूक करणे शक्य झाले नाही.
-------
शेतकºयांच्या बांधावर खरेदी करा
कोरोना संकटामुळे कोणीही घराबाहेर पडण्यास धजावत नसल्याने घरात धान्य असले तरी विक्र ीअभावी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आदिवासी शेतक-यांच्या हक्काची आदिवासी विकास महामंडळामार्फत एकाधिकार धान्य केंद्र पुन्हा कार्यालयीत करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच शेतक-याच्या बांधावर जाऊन धान्य खरेदी योजना सुरू करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे. आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक खते, बी-बियाणे, औषधे खरेदी करतात. या वर्षी कोरोना व लोक लॉकडाउन यामुळे एकाधिकार धान्य खरेदी केंद्र बंद पडली.
----------
पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने शेतकºयांना आता शेतोपयोगी साहित्य खरेदी करावे लागणार असल्याने शासनाने आदिवासी शेतकºयांचे धान्य खरेदीसाठी गावोगावी खरेदी केंद्र सुरू केल्यास शेतकºयांना बी-बियाणे, खते खरेदी करणे सोपे जाईल.
-हरिदास भुसारे, शेतकरी,बेलपाडा