लॉकडाऊनचा कांदा उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 04:30 PM2020-06-20T16:30:21+5:302020-06-20T16:31:11+5:30

सायखेडा : कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बंद असलेले हॉटेल, रेस्टॉरंट आणि कांद्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे शहरी भागातील नाश्ता सेंटर बंद असल्याने कांद्याच्या मागणीत मोठी घट झालीआहे. किरकोळ बाजारात गिºहाईक खरेदीला जात नसल्याचा मोठा फटकादेखील कांदे खरेदीवर झाला असून, कांद्याची मागणी घटली आहे, त्यामुळे व्यापारी कमी दरात कांदा खरेदी करीत असल्याने त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

Lockdown hits onion growers | लॉकडाऊनचा कांदा उत्पादकांना फटका

सायखेडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याची झालेली आवक.

Next
ठळक मुद्देशेतकरी संकटात हॉटेल, रेस्टॉरंट बंद असल्याने मागणी घटली

सायखेडा : कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बंद असलेले हॉटेल, रेस्टॉरंट आणि कांद्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे शहरी भागातील नाश्ता सेंटर बंद असल्याने कांद्याच्या मागणीत मोठी घट झालीआहे. किरकोळ बाजारात गिºहाईक खरेदीला जात नसल्याचा मोठा फटकादेखील कांदे खरेदीवर झाला असून, कांद्याची मागणी घटली आहे, त्यामुळे व्यापारी कमी दरात कांदा खरेदी करीत असल्याने त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
शहरी भागात मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांचा तुटवडा असल्याने कांद्याच्या दरात बरीच प्रमाणात घसरण होत आहे. मागील दोन महिन्यांत सलग कांद्याचे दर कोसळत राहिल्याने कांदा उत्पादक शेतकºयांना मोठा फटका बसला आहे.
मार्च महिन्यात कांद्याला चौदाशे ते पंधराशे रु पये प्रतिक्विंटलला दर मिळत होता. या दरात शेतकºयांना चांगले दोन पैसे मिळत होते. २२ मार्चपासून सुरू झालेल्या जनता कर्फ्यू आणि त्यानंतर सलग सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरी भागातील बंद असलेले रेस्टॉरंट, हॉटेल आणि नाश्ता सेंटरमध्ये कांद्याची मागणी घटली आणि मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याच्या बाजारभावात सतत घसरण होत राहिली. नाशिक जिल्ह्यात सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे लासलगाव आणि पिंपळगाव, सायखेडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी साडेसहाशे ते सातशे रु पये दर महिनाभरात मिळाला आहे. उन्हाळ्यातील साठवणूक केलेल्या कांद्याला किमान दोन हजार रु पये प्रतिक्विंटल दर मिळण्याची अपेक्षा शेतकºयांना होती, मात्र अवघ्या सहाशे ते सातशे रु पये पर्यंत प्रतिक्विंटलला दर मिळत असल्याने शेतकºयांचा कांदा साठवणुकीचा आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने मोठा फटका बसला आहे.
उन्हाळ कांद्याची शेतकºयांनी मोठ्या प्रमाणामध्ये साठवणूक केली होती, मात्र जून महिन्यातच जोरदार पावसाला सुरु वात झाल्याने पावसामुळे साठवणूक केलेला कांदा टिकणार नाही, अशी चिन्हे दिसत असल्याने शेतकºयांनी लवकरच उन्हाळ कांदा विक्र ीसाठी बाजारात दाखल केला, मात्र शहरी भागातून येणाºया व्यापाºयांची संख्या घटली आहे. कांद्याला किरकोळ बाजारात मागणी नसल्याने व्यापाºयांकडून बाजार समितीच्या आवारात कांदा खरेदी केला जात नाही.
कोरोनापूर्व काळात मुंबई, ठाणे, आणि आसपासच्या परिसरात दररोज किमान १०० ते १२० गाड्या इतका कांदा लागत असे. बटाट्याची मागणीही ६० ते ७० गाड्या इतकी असे. नाशिक जिल्ह्यातून आवक होण्याचे हे प्रमाण कायम राहिले तर मुंबईत कांदा, बटाट्याचे दर वाढत नाहीत असा यापूर्वीचा अनुभव आहे. महानगर क्षेत्रातील हॉटेल, रेस्टॉरंट चालक किमान ४० ते ५० गाड्या कांदा खरेदी करीत. आता ही रोजची खरेदी थंडावली आहे. दिवसाला कांद्याने भरलेल्या जेमतेम ३० गाड्या या बाजारात येत असून, त्यानंतरही दर घटले आहेत.
कोरोना रोगाचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकºयांना बसला असून, मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याच्या मागणीत घट झाल्याने बाजारभावात घट झाली आहे. खर्चही वसूल होत नसल्याने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने कांद्याला पंधराशे ते दोन हजार रु पये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
हॉटेल व्यवसायात ग्राहकांच्या मागणीनुसार कांदा कोणत्याही दरात त्यांना पुरवठा करावा लागतो. हॉटेल व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याला मागणी असते, लॉकडाऊन सुरू असल्याने मार्च महिन्यापासून हॉटेल व्यवसाय बंद आहेत. हॉटेलमध्ये कोणत्याही प्रकारचे गिºहाईक येत नसल्याने कांदा खरेदी बंद आहे. याचा परिणाम नक्कीच कांद्याच्या बाजारभावावर झाला आहे.
- विकास भागवत, हॉटेल व्यावसायिक.
शहरी भागातील हॉटेल, रेस्टॉरंट, नाश्ता सेंटर बंद असल्याने कांद्याच्या खरेदीत मोठी घट झाली आहे. किरकोळ कांदा खरेदी करण्यासाठी ग्राहक घराबाहेर पडत नाही. शहरी भागातील लोक रस्त्यावर आणि बाजारात येत नसल्याने त्याचा प्रत्यक्ष फटका कांद्याचा बाजारभावावर झाला आहे. मागणी नसल्याने कांद्याला उठाव नाही, त्यामुळे दरही पुरेसा मिळत नाही.
-अनंत भुतडा, कांदा व्यापारी, सायखेडा.
 

Web Title: Lockdown hits onion growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.