लॉकडाऊन : २५० गोरगरीब कुटुंबांची ‘खिदमत’; मोफत दिला किराणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 01:21 PM2020-03-29T13:21:03+5:302020-03-29T13:22:44+5:30

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहेत. समाजातील दानशूरांनी पुढे येऊन संस्थेला आर्थिक मदतीचा हात द्यावा, जेणेकरून आगामी काळातसुध्दा अशाप्रकारे गरजूंची सेवा करता येऊ शकेल.

Lockdown: 'Poverty' of 4 poor families; Free Groceries | लॉकडाऊन : २५० गोरगरीब कुटुंबांची ‘खिदमत’; मोफत दिला किराणा

लॉकडाऊन : २५० गोरगरीब कुटुंबांची ‘खिदमत’; मोफत दिला किराणा

googlenewsNext
ठळक मुद्देसमाजामधील सधन लोकांशी संपर्क सुरू पुन्हा गोरगरीब गरजूंची ‘खिदमत’ सुरू केली जाईलएक महिन्याचा किराणा प्रत्येकी एका कुटुंबापर्यंत

नाशिक : ‘खिदमत’ तसा उर्दू शब्द या शब्दाचा मराठीत अर्थ सेवा असा होतो. या शब्दाचा समर्पक वापर करत जुने नाशिकमधील स्वयंसेवी संस्था खिदमत फाउण्डेशनद्वारे कोरोना पार्श्वभूमीवर पाळण्यात येणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात २५० गरजु कुटुंबांपर्यंत किराणा माल पोहचविण्यास या संस्थेच्या स्वयंसेवकांना यश आले आहे.
‘अन्न वाचवा, जीवन वाचवा’ हे या संस्थेचे घोषवाक्य आहे. शहर-ए-काझी सय्यद मोईजोद्दीन, नायब काजी एजाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली शहरात मागील काही महिन्यांपासून खिदमत फाउण्डेशन नाशिक ही संस्था गोरगरीब भुकेलेल्यांची भूक भागविण्यासाठी अविरतपणे झटत आहेत. केवळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित लॉकडाऊनच्या काळातच नव्हे तर या संस्थेमार्फत विविध औचित्य साधत यापुर्वी बेघर, निराश्रीत उघड्यावर वास्तव्य करणाऱ्यांपर्यंत जेवणाचे डबे पोहचविण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. कोरोना आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गोरगरीब हातावरील मोलमजुरी करणाºयांचा रोजगार ठप्प झाला आहे. कामे बंद झाल्याने त्यांना चूल पेटविण्याची भ्रांत पडली आहे. कोरोनापासून संरक्षणासाठी घरात बसण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

‘कोरोनापासून बचावासाठी घरातच थांबा...’
गरजुंचा शोध घेऊन त्यांच्या घरापर्यंत पोहचून खिदमत फाउण्डेशनचे स्वयंसेवक तांदूळ, विविध प्रकारच्या डाळी, गोडतेलाच्या पिशव्या, साखर,चहापावडर पोहचविण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून या स्वयंसेवकांची अशी ‘खिदमत’ सुरू आहे. सोशलमिडियाच्या माध्यमातून काजी यांनी समाजातील दानशूरांनाही आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. समाजाकडून येणा-या आर्थिक दानच्या रकमेतून किराणा मालाची खरेदी करुन ही संस्था गोरगरीब कुटुंबांपर्यंत ते पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. एक महिन्याचा किराणा प्रत्येकी एका कुटुंबापर्यंत पोहचविल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जेणेकरुन कोरोनाचा कोणीही बळी ठरणार नाही, असे काजी म्हणाले.
--
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहेत. समाजातील दानशूरांनी पुढे येऊन संस्थेपर्यंत आर्थिक मदतीचा हात द्यावा, जेणेकरून आगामी काळातसुध्दा संस्थेला अशाप्रकारे गरजूंची सेवा करता येऊ शकेल. अडीचशे कुटुंबांना महिनाभर पुरेल इतक्या प्रमाणात आवश्यक किराणा माल पोहचविला आहे. समाजामधील सधन लोकांशी संपर्क सुरू असून पुरेशा प्रमाणात आर्थिक रक्कम जमा होताच पुन्हा गोरगरीब गरजूंची ‘खिदमत’ सुरू केली जाईल.
- एजाज काजी, अध्यक्ष, खिदमत फाउण्डेशन, नाशिक

Web Title: Lockdown: 'Poverty' of 4 poor families; Free Groceries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.