लॉकडाऊन, संचारबंदीमुळे वाढते आहे. नैराश्य: मानसोपचारतज्ज्ञ हेमंत सोननीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 01:44 PM2020-04-11T13:44:45+5:302020-04-11T13:49:58+5:30
नाशिक- सध्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. त्याच बरोबर संचारबंदी देखील लागु आहे. शासन युध्दपातळीवर कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींमुळे नागरीकांमध्ये नैराश्येचे प्रमाण वाढु लागले असल्याची माहिती नाशिकचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी दिली.
नाशिक- सध्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. त्याच बरोबर संचारबंदी देखील लागु आहे. शासन युध्दपातळीवर कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींमुळे नागरीकांमध्ये नैराश्येचे प्रमाण वाढु लागले असल्याची माहिती नाशिकचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी दिली. इंडियन मेडीकल असोसिएशनचे नियोजीत अध्यक्ष असलेल्या डॉ. सोननीस यांनी सद्य स्थितीवर नागरीकांच्या असलेल्या मानसिकतेबाबत लोकमतला माहिती दिली.
प्रश्न: देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी त्यामुळे नागरीक चिंतेत आहेत. त्यातच अनेकांना लॉकडाऊन नंतरच्या बंदीची भीती वाटत आहे. त्याबाबत काय स्थिती आहे?
डॉ. सोननीस: कोरोनाच्या जागतिक संकटामुळे भीषण स्थिती निर्र्माण झाली आहे. विशेषत: लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे तर नागरीक धास्तावले आहेत. याशिवाय आपल्या भागात आणि अन्यत्रही कोरोना बाधीतांची माहिती मिळाल्यानंतर नागरीक पॅनीक होत आहेत. अनेकांना भविष्याची चिंता सतावते आहे. त्यातून नैराश्य वाढु लागल्याचे दिसत आहे. यासंदर्भात अनेक नागरीकांचे मानसोपचार तज्ज्ञांकडे फोन येत आहेत. त्यांचे समुपदेशन आम्ही करत आहोत. याशिवाय अनेक मानसोपचार तज्ज्ञांनी बºया केलेल्या रूग्णांच्या मनस्थितीवर देखील या सर्व परिस्थतीचा परीणाम होत आहे. त्यामुळे त्यांचे देखील आता फोन येऊ लागले आहेत.
प्रश्न: राज्यभरात अशाप्रकारे स्थिी असेल तर काय करावे?
डॉ. सोननीस: सध्या सर्वत्र मानसिक स्थिती अशी जाणवते. त्यामुळे राज्यस्तरावर मानसोपचार संघटनेच्या वतीने नागरीकांच्या समुपदेशनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. काही तज्ज्ञांचे नंबर आम्ही जाहिर केले असून त्यावर येणाºया नागरीकांच्या फोनवर समर्पक समुपदेशन केले जाते.
प्रश्न: एरवी कुटूंबासोबत वेळ देता येत नाही असे सांगणारे अनेक नागरीक आता मात्र वेळ कसा घालवावा याबाबत प्रश्न करताना दिसतात.
डॉ. सोननीस: हे खरे आहे. मात्र आता कुटूंबासाठी वेळ देताना आणखी दिवसभरात काय करावे असा प्रश्न अनेकांना पडलेला दिसतो. त्यामुळे अनेक जण टाईमपास करतात. वेळ घालवण्यासाठी वॉटस अॅप किंवा फेसबुक तास न तास बघितला म्हणजे वेळ सत्कारणी लागत नाही. त्यातून काही साध्य होत नाही. त्यासाठी ग् ाुणवत्तेपूर्ण वेळ घालवला पाहिेजे.
म्हणजे ब-याच गोष्टी आपल्याला दैनंदिन धावपळीमुळे करता येत नाही. अशा गोष्टी केल्या पाहिजेत. युट्यूब वरून काही चांगले व्यायामाचे व्हीडीओ बघून व्यायाम करायचा असेल तर तेही केले पाहिजे. काहींना गाण्याची आवड असते परंतु वेळ मिळत नाही. त्यामुळे गाणे शिकून एखादा व्हीडीओ तयार करून तो युट्यूब वर टाकता येऊ शकतो. शिकण्यासारख्या किंवा करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात त्या या कालावधीत करता येऊ शकतात. आपले अनेक नातेवाईक ज्या चांगल्या गोष्टी करीत असतील त्या आपण आपल्या घरात करू शकतो. त्यामुळे वेळ घालवा परंतु तो टाईम पास असता कामा नये तर त्यातून काही तरी सकारात्मक निघाले पाहीजे म्हणजे गुणवत्तापुर्ण वेळ घालवला पाहिजे.
मुलाखत- संजय पाठक