गंभीर स्थिती असलेले जिल्हे सोडून लॉकडाउन उठवावा : मेधा पाटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:49 PM2020-05-12T22:49:23+5:302020-05-12T23:29:26+5:30
नाशिक : ज्या जिल्ह्यांमध्ये गंभीर स्थिती आहे तो परिसर वगळून इतर ठिकाणी लॉकडाउन उठवावा. त्याचबरोबर पायी गावाकडे निघालेल्या नागरिकांच्या जाण्याची शासनाने सोय करावी, दारू दुकान तत्काळ बंद करावीत, अशा मागण्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केल्या.

कोरोना, लॉकडाउन आणि इतर विविध प्रश्नांवर मेधा पाटकर यांनी झूम अॅपद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. देशात श्रमिक, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असून, लॉकडाउनमुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन आवश्यक होता, मात्र एकदम सगळं बंद करण्यापेक्षा क्रमाक्रमाणे त्याबाबत निर्णय घेणे आवश्यक होते. आता लॉकडाउनची आवश्यकता नसून गंभीर स्थिती असलेला भाग वगळून इतर ठिकाणी लॉकडाउन मागे घ्यायला हवा. असे करत असतानाच लॉकडाउनमुळे गोरगरिबांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यायला हवी, असे त्या म्हणाल्या.
धुळे आणि मालेगावचे रुग्ण नाशिकला आणू नये असे वक्तव्य करणारे नाशिकचे महापौर आणि दोन आमदार व खासदारांविरुध्द सामाजिक समरसतेच्या दृष्टिकोनातून आपण आवाज उठविला पाहिजे, असे पाटकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. लॉकडाउनच्या काळात अनेक कामगार कायदे बदलण्यात आले असून, यातून उद्योगपतींना सवलती देण्यात आल्या तसेच केंद्र शासन श्रमिकांना सर्व टॅक्स माफी देणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.