ग्रामीण भागात गावच्या सीमा लॉकडाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:15 PM2020-03-27T23:15:37+5:302020-03-27T23:15:53+5:30

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी आपापल्या गावाच्या वेशी (सीमा) दगड, काटेरी झाडाच्या फांद्या व पोलिसांच्या नाकेबंदीने लॉकडाउन केल्या आहेत.

Lockdown of village boundaries in rural areas | ग्रामीण भागात गावच्या सीमा लॉकडाउन

ग्रामीण भागात गावच्या सीमा लॉकडाउन

Next

त्र्यंबकेश्वर : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी आपापल्या गावाच्या वेशी (सीमा) दगड, काटेरी झाडाच्या फांद्या व पोलिसांच्या नाकेबंदीने लॉकडाउन केल्या आहेत. देशातील खेडेपाडे लॉकडाउन करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याने आपण स्वत:ही घर, गाव सोडायचे नाही आणि दुसरे कोणी आपल्या गावात येऊ नये म्हणून अनेक गावांनी हा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. त्र्यंबकेश्वर-इगतपुरी गावाच्या सीमेवरील टाके घोटी या गावाने संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर बाहेर गावावरून येणारे लोक तसेच वाहने पूर्णपणे बंद केली आहेत.

Web Title: Lockdown of village boundaries in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.