तोतया जिल्हाधिकारी सटाण्यात गजाआड
By admin | Published: March 3, 2017 02:16 AM2017-03-03T02:16:52+5:302017-03-03T02:17:09+5:30
सटाणा : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून राज्यातील नव्वद ते शंभर जणांना चार ते पाच कोटी रुपयांना गंडा घालणारा तोतया जिल्हाधिकारी सटाणा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे
सटाणा : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून राज्यातील नव्वद ते शंभर जणांना चार ते पाच कोटी रुपयांना गंडा घालणारा तोतया जिल्हाधिकारी सटाणा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. हा तोतया बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील रहिवासी आहे. फसवणुकीचे रॅकेट कार्यरत असून, त्यात बडे मासे अडकण्याची शक्यता आहे.
बुधवारी सटाणा पोलिसांनी सापळा रचून तोतया जिल्हाधिकारी विवेक विलास सोनवणे याला गजाआड केले. कारवाईत त्याच्याकडून कार, ८७ हजारांची रोकड भरती प्रक्रि येतील प्रश्न, उत्तर पत्रिका, उमेदवारांचे दस्तऐवज, धनादेश आदी आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत करण्यात आले. बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी कार्यरत असल्याचे या निमित्त उघडकीस आले आहे. पोलिसांनी विवेक सोनवणे याच्यासह धाकराव तात्या रा. विंचूर ता.निफाड , वाघचौरे (पूर्ण नाव माहित नाही) रा. नाशिक ,आनंद काळे, नवलकिशोर दुधे, शामिसंग ठाकूर रा. अमरावती अशा सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडा घालणारी राज्यात मोठी टोळी कार्यरत असून या टोळीचे नाशिक कनेक्शन आहे. या रॅकेट मध्ये काही बडे अधिकारी व राजकारणातील हस्तीचा समावेश असल्याची जोरदार चर्चा आहे.n दरम्यान पोलिसांनी गजाआड केलेल्या विवेक सोनवणे याला गुरु वारी सटाणा न्यायालया समोर उभे केले असता न्यायालयाने ६ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.