जामदरी शाळेला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:46 AM2018-07-09T00:46:07+5:302018-07-09T00:47:04+5:30
नांदगाव : शासनाने सर्वशिक्षा अभियान हाती घेतल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सुविधा मिळू लागल्या आहेत. मात्र या अभियानातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांना शिक्षक मिळत नसल्याचे समोर आले आहे.
नांदगाव : शासनाने सर्वशिक्षा अभियान हाती घेतल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सुविधा मिळू लागल्या आहेत. मात्र या अभियानातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांना शिक्षक मिळत नसल्याचे समोर आले आहे.
नांदगाव तालुक्यातील जामदारी तांड्यावरील जिल्हा परिषद शाळेला सुरू होऊन २० दिवस झाले; पण अजूनही येथे शिक्षक उपलब्ध नसल्याने पालकांनी शाळेला टाळे ठोकले. जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत टाळे उघडले जाणार नाही असा पवित्रा घेतला आहे.
जामदारी तांड्यावरील जि. प. शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. येथे सुमारे ५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नाही. रोज सकाळी बाहेरील एक मास्तर शाळा उघडून जातात आणि दिवसभर विद्यार्थी वर्गात धिंगाणा घालतात. त्यांच्या शिक्षणाची एैशी की तैसी होत असल्याचे चित्र आहे.