मुख्याधिकाºयांच्या दालनाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:20 AM2017-08-19T01:20:24+5:302017-08-19T01:20:48+5:30

येवला नगरपालिकेचे नियमित मुख्याधिकारी दीर्घकालीन रजेवर गेल्याने गेल्या अडीच महिन्यांपासून येवला नगरपालिकेला मुख्याधिकारी नाही. शहरातील विविध समस्यांबाबत नगरसेवकांना विचारणा होत असल्याने नगरपालिकेच्या अपक्ष नगरसेवकांनी नियमित मुख्याधिकाºयाच्या मागणीसाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनालाच कुलूप ठोकले.

Locked lock at the door of the headquarters | मुख्याधिकाºयांच्या दालनाला ठोकले कुलूप

मुख्याधिकाºयांच्या दालनाला ठोकले कुलूप

Next

येवला : येवला नगरपालिकेचे नियमित मुख्याधिकारी दीर्घकालीन रजेवर गेल्याने गेल्या अडीच महिन्यांपासून येवला नगरपालिकेला मुख्याधिकारी नाही. शहरातील विविध समस्यांबाबत नगरसेवकांना विचारणा होत असल्याने नगरपालिकेच्या अपक्ष नगरसेवकांनी नियमित मुख्याधिकाºयाच्या मागणीसाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनालाच कुलूप ठोकले. मुख्याधिकारी नसल्याने शहरामध्ये सर्वच कामांचा खोळंबा झाला असून, जनतेच्या प्रश्नांना वैतागून अपक्ष नगरसेवकांनी शुक्र वारी दुपारी दालनाला कुलूप ठोकले.
येवला नगरपालिकेला जून महिन्यापासून मुख्याधिकारी नसल्याने मनमाड नपाचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. तेदेखील येवला पालिकेत आठवड्यातून किती दिवस येतात याबाबत कोणालाही माहिती नाही. त्यामुळे शहरातील विकासकामे खंडित झाली आहे. विस्थापित गाळेधारकांच्या प्रश्नासंदर्भात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पालकमंत्र्याच्या भेटीसाठीदेखील मुख्याधिकारी उपलब्ध होऊ शकले नाही. गाळेधारकांचा प्रश्न सोडवण्यासाठी नियमित मुख्याधिकारी असणे गरजेचे
आहे. अनेक प्रश्न प्रलंबित राहत असल्याने येवल्यातील जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कामांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने शहरात अस्वच्छता वाढली आहे. गावातील पथदीप कधी बंद व कधी चालू होतात. नागरिक थेट नगरसेवकांनाच जाब विचारू लागल्याने नगरसेवक त्रस्त झाले. स्वातंत्र्य दिनाला पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता हे दोघेही उपस्थित नाही. यासह शहरातील विविध समस्येबाबत अपक्ष नगरसेवक नगरपालिकेत आवाज उठवितात मात्र त्यांच्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नाही. तर सर्वसामान्य नागरिकांची काय? हा प्रश्न आहे. मुख्याधिकारी शहरात येतच नसल्याने काय कामे होणार? असा संतप्त सवाल करीत अपक्ष नगरसेवक रु पेश लोणारी, शिफक शेख, अमजद शेख, सचिन मोरे यानी मुख्याधिकारी यांच्या दालनाला कुलुप ठोकले.

Web Title: Locked lock at the door of the headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.