प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप

By Admin | Published: September 6, 2015 10:58 PM2015-09-06T22:58:14+5:302015-09-06T22:59:21+5:30

कनाशी : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार

Locked to the Primary Health Center | प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप

प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप

googlenewsNext

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित राहत नसल्याने आदिवासी जनतेचे हाल होत असल्याने ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले.
शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत डॉक्टर उपस्थित झाले नव्हते. फक्त कर्मचारीवर्ग हजर होता. रुग्ण डॉक्टरांची प्रतीक्षा करत होते. दीड वर्षापासून एकच वैद्यकीय अधिकारी दिला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून दखल घेतली जात नसल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या खुर्चीला हार घालून आरोग्य केंद्राला कूलूप लावले.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तीन दिवस डॉक्टराविना ओस पडलेले असते. त्यामुळे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून रिकाम्या हाती परतावे लागत आहे.
खासगी दवाखान्याचा आसरा घेण्याची वेळ आदिवासी जनतेवर आली आहे. सदर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रामभरोसे कारभारात सुधारणा होत नसल्याने ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावले.
यावेळी नितीन बोरसे, अशोक बोरसे, पप्पू बच्छाव, केदा वाघ, सोहन महाजन, नीलेश जाधव, राजेंद्र बिरारी, प्रशांत गोविंद, मनोज देसाई, खंडू पवार, अरिफ सैयद, गोविंद वाघ, सोपान बोरसे, संदीप जाधवसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Locked to the Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.