आसरखेडे ग्र्रामपंचायतीस ठोकले कुलूप

By Admin | Published: September 10, 2014 10:24 PM2014-09-10T22:24:14+5:302014-09-11T00:02:08+5:30

आसरखेडे ग्र्रामपंचायतीस ठोकले कुलूप

Locker locked by Ashkhede Gram Panchayats | आसरखेडे ग्र्रामपंचायतीस ठोकले कुलूप

आसरखेडे ग्र्रामपंचायतीस ठोकले कुलूप

googlenewsNext


चांदवड : तालुक्यातील आसरखेडे ग्रामपंचायतीच्या तेराव्या वित्त आयोगातील सुमारे ४७ हजार रुपये किमतीचा रस्ता दाखवून पैसे गायब केले, पाणीपुरवठा योजनेचे नळ डिपॉझिट मधील ३० हजार रुपये गायब केले, आरोग्य खात्यावरील पाण्यात टीसीएल पावडर न टाकता खर्च दाखविला, ग्रामसेविका श्रीमती समशेर या सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करीत नाही, दप्तर मागतले असता ते आॅडिटसाठी गेल्याचे सांगतात, मार्च ते आतापावेतो आॅडिट आॅनलाइन झाले नाही त्यामुळे गैरव्यवहार अजूनही उघडकीस येतील, तर ग्रामपंचायतीत ग्रामसेविका कधीही उपस्थित राहत नाहीत. या अनेक कारणांवरून चांदवड पंंचायत समितीकडे अनेक वेळा लेखी तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने आसरखेडे सदस्य व ग्रामस्थांनी अखेर कार्यालयास कुलूप ठोकले आहे. आसरखेडे येथील ग्रामसेविकेबाबत चांदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे चारवेळा लेखी तक्रार करूनही त्यांची चौकशी न केल्याने सदस्य, ग्रामस्थांना कुलूप लावण्याचा निर्णय घ्यावा लागला.


असे निवेदनात सदस्य संतोष मोतीराम पवार, आनंदा कचरू साबळे, निर्मलाबाई दिवटे, लक्ष्मीबाई थोरमिसे, सीताबाई बर्डे, ग्रामस्थ सुधाकर थोरमिसे, सुभाष जाधव, कैलास रकिबे, संतोष पवार, संजय दिवटे, नारायण थोरमिसे, संपत थोरमिसे, दगू दिवटे, रामदास पवार, सुकदेव दिवटे आदिंसह असंख्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Locker locked by Ashkhede Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.