वीज उपकेंद्राला ठोकले टाळे; कर्मचाऱ्यांना कोंडले
By admin | Published: March 4, 2017 12:13 AM2017-03-04T00:13:38+5:302017-03-04T00:13:49+5:30
वडांगळी : विजेच्या समस्येने संतप्त झालेल्या खडांगळी येथील शेतकऱ्यांनी वडांगळी उपकेंद्राला टाळे ठोकून शाखा अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना सुमारे तासभर कोंडून ठेवले
वडांगळी : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात दिवसेंदिवस वीजप्रश्न बिकट होत आहे. विजेच्या समस्येने संतप्त झालेल्या खडांगळी येथील शेतकऱ्यांनी वडांगळी उपकेंद्राला टाळे ठोकून शाखा अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना सुमारे तासभर कोंडून ठेवले. सिन्नरचे उपअभियंता विनायक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शेतकऱ्यांनी शाखा अभियंता मंगेश खर्जे यांच्यासह कर्मचाऱ्यांना कोंडून उपकेंद्राला टाळे ठोकले. सोमवारपर्यंत सुरळीत वीजपुरवठा करण्याचे लेखी आश्वासन
मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी अनिल कोकाटे, विलास ठोक, ज्ञानेश्वर ठोक, गोरख कोकाटे, गणेश कोकाटे, खंडू ठोक, रमेश कोकाटे, मच्छिंद्र कोकाटे, शिवनाथ कोकाटे, बाळासाहेब ठोक, नवनाथ ठोक, अण्णा गिते, सुकदेव कोकाटे, लक्ष्मण कोकाटे, विशाल कोकाटे, कैलास पगार, भास्कर मुरडनर,
अमोल कोकाटे उपस्थित होते.
(वार्ताहर)