लोहोणेर आरोग्य केंद्रास आनंदीबाई जोशी पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:11 AM2018-04-14T00:11:33+5:302018-04-14T00:11:33+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराने गौरविण्यात आले. नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
लोहोणेर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराने गौरविण्यात आले. नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
लोहोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने उत्कृष्ट कामकाज केल्याने पुरस्कार मिळाला. कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. नाशिक येथे जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जि. प. सदस्य धनश्री अहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाघचौरे यांच्या उपस्थितीत आनंदीबाई जोशी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. २५ हजार रु पये रोख व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. लोहोणेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने देवळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, डॉ. योगेश पवार, औषधनिर्माता सुरेश पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी आरोग्य सहायक विष्णू परदेशी, बी. एस. पवार, सोनाली पाटील, लीना सावंत, अर्चना मोहोन, अलका निकम, सतीश निकम, ज्ञानेश्वर कानडे, संजय कुºहाडे आदी उपस्थित होते.