लोहोणेर ग्रामपंचायतीकडून विनामास्क फिरणाऱ्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 07:09 PM2021-03-18T19:09:20+5:302021-03-19T01:16:46+5:30
लोहोणेर : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांमध्ये मात्र कोणतेही गांभीर्य दिसून येत नसल्याने गुरुवारी ग्रामपंचायतीच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या ४२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ६७०० रुपयांचा दंड वसूल करून त्यांना नवीन मास्कची भेट देण्यात आली.

ग्रामपंचायतीने अचानक दंडात्मक कारवाई सुरू केल्याने विनामास्क फिरणाऱ्या नागरिक व दुचाकीस्वारांमध्ये खळबळ उडाली होती. देवळा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गावागावात रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य यंत्रणा व स्थानिक प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी आवाहन करूनसुद्धा नागरिकांना त्याचे गांभीर्य नसल्याने गुरुवारी (दि. १८) लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली.
यावेळी योगेश पवार, रमेश आहिरे, निंबा धामणे, रतिलाल परदेशी, धोंडू आहिरे, अनिल आहेर, राकेश गुळेचा, समाधान महाजन, रोशन खराटे, ग्रामविकास अधिकारी यू. बी. खैरनार, भूषण अहिरे, निंबा अहिरे, जगन माळी आदी सहभागी झाले होते.