लोहोणेरला भाजीपाला फेकला रस्त्यावर
By admin | Published: June 6, 2017 02:48 AM2017-06-06T02:48:48+5:302017-06-06T02:48:57+5:30
लोहोणेर : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या पाचव्या दिवशी किसान क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोहोणेर गावात पाठिंबा मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहोणेर : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या पाचव्या दिवशी किसान क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोहोणेर गावात शंभर टक्के पाठिंबा मिळाला. दिवसभर लोहोणेर गावातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. लोहोणेर येथील शेतकरी बांधवांचे वतीने सटाणा-देवळा रस्त्यावरील वसाका फाट्याजवळ सकाळी साडे दहाच्या सुमारास संतप्त शेतकऱ्यांनी कांद्यासह इतर भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला व मुख्यमंत्र्याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. सुमारे अर्धा तास सुरू असलेले हे आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात रमेश आहिरे, गोरख बागुल, नाना जगताप, हरिसिंग परदेशी, भारत निकम, अशोक अलई, सोपान सोनवणे, योगेश पवार, दीपक बागुल, सोमनाथ निकम, मनोज देशमुख, जाकीर शेख, मच्छिंद्र बागुल, किशोर अवस्थी, प्रकाश पवार, भरत बिरारी, विकी देशमुख, भगवान जाधव, विनोद शेवाळे, माणिक अहेर, बाळू देशमुख, बारकू जगताप आदींसह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते .यावेळी देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.