लोहोणेरला अधिकाऱ्यांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:16 AM2021-08-29T04:16:56+5:302021-08-29T04:16:56+5:30

लोहोणेर : महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या पंचायत राज समितीच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी लोहोणेर येथे अचानक भेट देऊन गावात झालेल्या ...

Lohoner was attacked by the authorities | लोहोणेरला अधिकाऱ्यांची झाडाझडती

लोहोणेरला अधिकाऱ्यांची झाडाझडती

Next

लोहोणेर : महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या पंचायत राज समितीच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी लोहोणेर येथे अचानक भेट देऊन गावात झालेल्या विविध विकास कामांची पाहणी करीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. गावांतील रस्ते काँक्रिटीकरण, घरकुल योजना व आदिवासी वस्तीतील नळ पाणी पुरवठा योजना आदी कामांची पाहणी पंचायत राज समितीच्या पथकाने केली. दरम्यान, पंचायत राज समितीच्या पथकाने पशुसंवर्धन केंद्रास भेट देऊन पाहणी केली व पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय महाजन यांच्याशी चर्चा केली. समितीने येथील आदिवासी वस्तीमध्ये झालेल्या रमाई व इतर घरकुल योजनांच्या काही निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता, अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. पथकात आ. प्रशांत बंब, आ. अंबादास दानवे, आ. रत्नाकर गुटे, विधिमंडळ अधिकारी तथा जिल्हा परिषद प्रशासकीय अधिकारी दीपक चाटे, गजानन बोरले, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, कृषी अधिकारी प्रशांत पवार, जयवंत भामरे (विस्तार अधिकारी), उप अभियंता वाणी, एस. जे. पगार, आर. बी. चव्हाण, ठाकरे आदी अधिकारी वर्ग, तसेच लोहोणेर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यु. बी. खैरनार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. लोहोणेर येथे गेल्या तीन वर्षांपूर्वीच्या घरकुल बांधकामाबाबत या पथकाने प्रत्यक्ष लाभार्थींची भेट घेतली व निकृष्ट दर्जाच्या कामकाजाबाबत उघड-उघड नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. (२८ लोहोणेर पंचायत)

280821\28nsk_14_28082021_13.jpg

२८ लोहोणेर पंचायत

Web Title: Lohoner was attacked by the authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.