लोहोणेरला विलगीकरण कक्ष कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 11:31 PM2021-04-19T23:31:38+5:302021-04-20T00:08:43+5:30
लोहोणेर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णसंख्या वाढत असल्याने लोहोणेर येथे कोरोना नियंत्रण समितीने पुढाकार घेऊन विलगीकरण कक्ष निर्माण केला आहे. अपुऱ्या जागेअभावी गृहविलगीकरण शक्य होत नसल्याने याबाबत स्थानिक कोरोना नियंत्रण समितीने तातडीने येथील जनता विद्यालयात स्थानिक रुग्णांच्या सोयीसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात पुढाकार घेतला.

याठिकाणी रुग्णासाठी स्पेशल बेड, फॅन, पिण्याच्या पाण्याची सोय आदी सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी या विलगीकरण कक्षात रुग्ण आले असून सोमवारी (दि. १९) देवळा तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ, आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे पोलीस निरीक्षक मातोंडकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी कोरोना नियंत्रण समितीचे योगेश पवार, रमेश आहिरे, पंडित पाठक, प्रसाद देशमुख, रतिलाल परदेशी, दीपक देशमुख, संजय सोनवणे, नाना जगताप, गणेश शेवाळे ग्रामविकास अधिकारी यु. बी. खैरनार आदी उपस्थित होते.
दरम्यान, लोहोणेर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्यावतीने आतापर्यंत १३६७ व्यक्तींना कोविड लसीकरण करण्यात करण्यात आले आहे.