नाशिकमध्ये महायुतीचे शक्ती प्रदर्शन; हेमंत गोडसे डॉ. भारती पवार आज अर्ज दाखल करणार
By संजय पाठक | Updated: May 2, 2024 13:28 IST2024-05-02T13:28:10+5:302024-05-02T13:28:49+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या सभेच्या ठिकाणी दाखल होणार आहेत.

नाशिकमध्ये महायुतीचे शक्ती प्रदर्शन; हेमंत गोडसे डॉ. भारती पवार आज अर्ज दाखल करणार
नाशिक जिल्हा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार तथा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच संजय पाठक- नाशिक लोकसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे आज अर्ज दाखल करत असून काही वेळातच शक्ती प्रदर्शन करीत मिरवणूक या प्रारंभ होणार आहे.
या मिरवणुकीत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, आमदार संजय शिरसाठ तसेच अन्य मान्यवर सहभागी झाले आहेत. काही वेळातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या सभेच्या ठिकाणी दाखल होणार आहेत. महायुतीची मिरवणूक सुरू झाल्यानंतर ती शालिमार, महात्मा गांधी रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार असून यावेळी दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.