सिडकोत मतदारांच्या रांगा; जेष्ठ नागरिकांसह तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By Suyog.joshi | Published: May 20, 2024 12:47 PM2024-05-20T12:47:28+5:302024-05-20T12:48:17+5:30
नाशिक लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळी सुरूवात झाली.
सिडको,नाशिक (नरेंद्र दण्डगव्हाळ) : नाशिक लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळी सुरूवात झाली. सकाळपासूनच गणेश चौक तसेच मारवाडी हायस्कूल होते मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. मतदार हे स्वयंस्फूर्तीने मतदान करताना दिसून आले. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
उन्हाचा तडाखा अधिक असल्याने सकाळीच अनेक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांकडे असलेला मोबाईल घेऊन जाण्यास पोलिसांनी मज्जाव केलाने अनेक मतदारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तर काही मतदारांनी मोबाईल आतमध्ये घेऊन दिला नसल्याने मतदान न करताच माघारी फिरणे पसंत केले मोबाईल कोणाकडे द्यावा असा प्रश्न उपस्थित करत अनेक मतदाराने मतदान न करताच घरी जाणे पसंत केले. विशेष म्हणजे प्रत्येक मतदार केंद्रावर ठेवण्यात आलेले पोलीस हे पर राज्यातील असल्याने ते कोणालाही आत मध्ये सुरत नव्हते याचा फटका राजकीय पुढे यांना देखील बसला.
सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर 7:45 वाजेच्या सुमारास मोरवाडी येथील हायस्कूलमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडले होते. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, मतदान केंद्रवर असलेले अधिकाऱ्यांनी ते मशीन बदलून त्या जागी तात्काळ नवीन मशीन बसवले यानंतर पुन्हा मतदान सुरळीत झाले.
प्रत्येक वेळी मतदान होताना अनेकांची नावे गायब होत असल्याचे प्रकार यंदाच्या निवडणुकीतही दिसून आले. काही मतदारांची नावे गायब झालेले होती, तर काही मतदारांना त्यांचा मूळ ठिकाणी मतदार असताना दुसरीकडे लांब मतदार यादी त्यांचे नाव टाकण्यात आलेले. त्याबद्दल मतदारांनी नाराजी व्यक्त केली. सोमवारी मतदान सुरू असताना गणेश चौक मनपा शाळा राहुल गरुड या अपंग महिलेने तर नंदू जाधव या दिव्यांग बांधवाने मतदानाचा हक्क बजावला.