नाशिकमध्ये मतदान केल्याबद्दल मिळाले रोपट्याची भेट; अर्थ फाऊंडेशनचा उपक्रम
By संजय पाठक | Published: May 20, 2024 01:30 PM2024-05-20T13:30:43+5:302024-05-20T13:32:31+5:30
लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठीनाशिकमधील विविध संस्थांनी ‘वाेट कर नाशिककर’ अशी मेाहीम राबवली.
संजय पाठक, नाशिक: लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठीनाशिकमधील विविध संस्थांनी ‘वाेट कर नाशिककर’ अशी मेाहीम राबवली. त्यानंतर मतदान करणाऱ्यांना मतदारांना अनेक व्यवसायिकांनी सवलती देखील जाहीर केल्या आहेत. आज मतदान करणाऱ्यांना नाशिक मधील अर्थ फाऊंडेशनच्या वतीने मतदान करणाऱ्यांना रोपटे देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. आता दुपारपर्यंत पाचशेहून अधिक रोपे मतदारांना देण्यात आली.
सोनल दगडे आणि अमित लोहाडे यांच्या पुढाकाराने हा उापक्रम राबवण्यात आला.गंगापूररोडवर केबीटी कॉलेजजवळ मतदान केलेल्या मतदारांना आजच्या मतदानाची आठवण म्हणून रोपटे भेट देण्यात आले आणि सेल्फीही काढण्यात आले. पाच वर्षे हे रोप वाढवावे म्हणजे मतदानाची आठवण राहील, असे यावेळी सोनल दगडे यांनी सांगितले. दरम्यान, नाशिकमध्ये कापड व्यापारी तसेच अन्य काही विक्रेत्यांनी मतदान करणाऱ्यांना पाच ते दहा टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे.