लोकसभा निवडणुक : राजकीय पक्ष कार्यालये गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:44 AM2019-03-12T00:44:47+5:302019-03-12T00:45:13+5:30

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसांपासून शहरात प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये सकाळपासूनच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रेलचेल सुरू झाली आहे.

Lok Sabha elections: Political party offices gulpajali | लोकसभा निवडणुक : राजकीय पक्ष कार्यालये गजबजली

लोकसभा निवडणुक : राजकीय पक्ष कार्यालये गजबजली

Next

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसांपासून शहरात प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये सकाळपासूनच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रेलचेल सुरू झाली आहे. उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या पातळीवरच होणार असल्यामुळे कार्यकर्त्यांचे वृत्तवाहिन्यांकडे लक्ष लागून होते. अनेक ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होती, तर काही ठिकाणी कार्यकर्ते मतदार याद्यांची पडताळणी करीत असल्याचेही दिसून आले.  गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा सुरू असतानाच त्यामध्ये उमेदवारीचा दावा करण्यात आलेल्या फलकांनीही लक्ष वेधून घेतले होते. काहींनी संभाव्य उमेदवारी गृहित धरून संपर्कसत्रालादेखील आपापल्या पातळीवर सुरुवात केली होती. प्रत्यक्ष पक्ष कार्यकर्ते आणि कार्यालयांमध्ये निवडणुकीचे कोणतेही वातावरण दृष्टीस पडत नव्हते. रविवारी (दि.१०) रोजी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर  दुसऱ्या दिवसापासून पक्षीय कार्यालयातील वर्दळ वाढल्याचे दिसून आले.  मनसेच्या नवीन बसस्थानक येथील ‘राजगड’ या मध्यवर्ती कार्यालयात काही कार्यकर्ते मतदार याद्यांची पडताळणी करीत असल्याचे दिसून आले,  तर पक्षाचे फलक झाकण्याचे काम काही कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होते. राष्टÑवादी कार्यालयातह  मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची संख्या होती. राष्टÑवादीच्या कार्यालयात शहरातील पदाधिकारी तसेच काही ज्येष्ठ नेते आवर्जून कार्यालयात हजर होते. या ठिकाणी कार्यकर्त्यांबरोबर  चर्चा करून संभाव्य परिस्थितीवर भूमिका निश्चित केली जात असल्याचे सांगण्यात आले.
उत्साहाचा अभाव
एन. डी. पटेलरोडवरील भारतीय जनता पार्टी आणि शालिमार येथील शिवसेनेच्या कार्यालयात काही ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्तेही कार्यालयात हजर होते. युतीचा उमेदवार निश्चित नसल्यामुळे दोन्ही कार्यालयात उत्साहाचा अभाव जाणवला. नाशिकची लोकसभेची जागा शिवसेनेला सोडण्यात येणार असल्यामुळे भाजपाकडून उमेदवारी घोषित होण्याची वाट पाहिली जात आहे, तर सेनेकडून कुणाला उमेदवारी मिळते याविषयीचा सस्पेन्स आहे.
महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
महात्मा गांधीरोडवरील कॉँग्रेस कार्यालयात बºयापैकी उत्साह दिसून आला. सकाळच्या सत्रात प्रमुख पदाधिकाºयांची बैठकही झाली. पक्षाच्या विविध आघाड्यांचे नेते आणि पदाधिकारी सकाळपासूनच कॉँग्रेस कार्यालयात दाखल झाले होते. आचारसंहिता जाहीर झाल्यापासून कार्यालयातील कामकाजाला वेग आला आहे. सकाळच्या सत्रात अध्यक्ष शहर अहेर यांनी कार्यालयात काही महत्त्वाच्या पदाधिकाºयांची बैठक घेतली असे समजते.
कार्यालयांवरील  फलक ‘जैसे थे’
आचारसंहिता जाहीर होऊनही अनेक राजकीय पक्षांचे फलक कायम आहेत. कार्यालयांवरील नावे, फलक, पक्षाचे चिन्ह दुपारपर्यंत झाकण्यात आलेली नव्हती. मनसे कार्यालयांवरील पक्षाचे नाव झाकण्यात आले होते. तर कोनशिलेला देखील पेपर चिकटविण्यात आले आहेत. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी स्वत:हून कार्यालयावरील पक्षीय नाव झाकणे आणि झेंडे काढणे अपेक्षित असते.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपल्या भुमिकेत आल्याचे चित्र होते. पक्षाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आचारसंहितेच्या दुसºया दिवशीच प्रत्येक कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. पक्षांचे मोठे नेते सध्या मुंबईच्या वारी करीत असल्यामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचीही गर्दी होऊ लागली आहे. उमेदवारी मिळविण्यासाठीची चुरस आणि युती-आघाडीतून कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे दिसून आले.
 पक्षीय कार्यालयावरील फलक एकीकडे झाकले जात असतांना नेत्यांच्या वाहनांवरील स्टीकर्स मात्र अजनही जैसे थे असल्याचे दिसून आले. राजकीय पक्षांच्या बाहेर आता नेते आणि कार्यकर्त्यांच्या गाड्या उभ्या असल्यामुळे यातील बहुतांश गाड्यांवरील पुढच्या आणि मागच्या काचेवर तसेच नंबर प्लेटवर पक्षीय चिन्ह कायम असल्याचे दिसून आले.

Web Title: Lok Sabha elections: Political party offices gulpajali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.