लोकमान्य टिळक टर्मिनस : हावडा विशेष गाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 06:38 PM2021-06-03T18:38:30+5:302021-06-04T01:09:59+5:30
मनमाड : मध्य रेल्वेने गाडी क्रमांक ०२१०१/०२१०२ लोकमान्य टिळक टर्मिनस : हावडा विशेष गाडीची वारंवारीता द्वि-साप्ताहिक वरून आठवड्यातून चार दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनमाड : मध्य रेल्वेने गाडी क्रमांक ०२१०१/०२१०२ लोकमान्य टिळक टर्मिनस : हावडा विशेष गाडीची वारंवारीता द्वि-साप्ताहिक वरून आठवड्यातून चार दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेन क्रमांक ०२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस - हावडा विशेष गाडी चार जून ते २९ जूनपर्यंत सोमवार, मंगळवार, शुक्रवार आणि शनिवारी म्हणजेच आठवड्यातून चार दिवस चालविण्यात येईल. ट्रेन क्रमांक ०२१०२ हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी सोमवार, बुधवार, गुरुवार आणि रविवारी म्हणजेच आठवड्यातून चार दिवस चालविण्यात येईल. केवळ कम्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल असे सांगण्यात आले.