लोकमत ‘नाशिकरोड प्रॉपर्टी प्रदर्शनाचा समारोप

By admin | Published: October 10, 2016 01:04 AM2016-10-10T01:04:23+5:302016-10-10T01:05:03+5:30

लोकमत ‘नाशिकरोड प्रॉपर्टी प्रदर्शनाचा समारोप

Lokmat 'concludes Nashik Road property show | लोकमत ‘नाशिकरोड प्रॉपर्टी प्रदर्शनाचा समारोप

लोकमत ‘नाशिकरोड प्रॉपर्टी प्रदर्शनाचा समारोप

Next

नाशिक : ‘लोकमत’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘नाशिकरोड प्रॉपर्टी शोकेस २०१६’या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन सोहळ्यास रविवारी (दि. ९) शेवटच्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवस चाललेल्या या प्रॉपर्टी प्रदर्शनामध्ये नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या विविध प्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी ‘लोकमत’ने उपलब्ध करून दिल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.
नाशिक-पुणे महामार्गावरील शिखरेवाडी समोरील स्टार झोन मॉल, पारपत्र कार्यालयाशेजारी लोकमतने नाशिकरोड आणि शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे ‘लोकमत नाशिक शोकेस - २०१६’ हे भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच प्रदर्शनाला भेट देण्यासाठी नागरिक, महिलांनी भेट देण्यासाठी गर्दी केली होती.
या प्रदर्शनामध्ये सहभागी बांधकाम व्यावसायिकांनी आपले पूर्ण झालेले, सुरू असलेले आणि लवकरच सुरू होणाऱ्या प्रोजेक्टची माहिती नागरिकांना देण्यात येत होती. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिक, महिलांना बांधकाम व्यावसायिकांचे शहरात आणि इतरत्र सुरू असलेल्या प्रोजेक्टची माहिती एकाच छताखाली मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. रविवारच्या सुटीमुळे दुपारपासून प्रदर्शन बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेकांनी आपल्या घरांचे, दुकानांचे, आॅफिसचे स्वप्न साकार करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून माहिती घेतली.
प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने प्रदर्शनाचा कालावधी वाढवावा किंवा लवकरच असे प्रदर्शन भरविण्यात यावे, अशी अपेक्षा सहभागी बांधकाम व्यावसायिक तसेच प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. तीन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात समारोप झाला. यावेळी लोकमतकडून प्रदर्शनात सहभागी बांधकाम व्यावसायिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Lokmat 'concludes Nashik Road property show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.