लोकराज्य महाभियानातुन होणार १०० पाझरतलाव गाळमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 03:38 PM2018-04-03T15:38:27+5:302018-04-03T15:38:27+5:30
जळगाव नेऊर - अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) व ग्रामपंचायत एरंडगाव खु यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडगाव येथे गाळ मुक्त धरण योजने अंतर्गत गाळ काढण्याचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी भिमराज दराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दराडे यांनी येवला तालुक्यातील १०० पाझर तलावातील गाळ काढण्याचे उद्दीष्ठ असल्याचे सांगितले.
जळगाव नेऊर - अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) व ग्रामपंचायत एरंडगाव खु यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडगाव येथे गाळ मुक्त धरण योजने अंतर्गत गाळ काढण्याचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी भिमराज दराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दराडे यांनी येवला तालुक्यातील १०० पाझर तलावातील गाळ काढण्याचे उद्दीष्ठ असल्याचे सांगितले. दराडे म्हणाले, पाझर तलावातील गाळ काढल्याने पाण्याची पातळी वाढणार असुन निघणारे गाळामुळे परिसरातील शेतीचा पोत सुधारून भुजल पातळीत वाढ होऊन उन्हाळ्यात होणारी पाणी टंचाई दुर होईल यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी तहसिलदार नरेशकुमार बहिरम,अनुलोम विभाग प्रमुख अमित डमाळे, जिल्हा प्रमुख तौफिक शेख , तालुका प्रतिनिधी संतोष चव्हाण,गट विकास आधिकारी सुनिल अहिरे,लघु पाटबंधारे अभियंता पवार व जगताप,तालुका कृषी अधिकारी अभय फलके,बाजार समतिी संचालक कांतीलाल साळवे,शिवसेना नेते छगन आहेर,सरपंच मंदाकिनी पडवळ,सुदाम पडवळ,काका पडवळ,एरडगाव बुद्रुक चे सरपंच विठ्ठलराव जगताप,बबन पिंगट,भाऊसाहेब जोंधळे,ज्ञानेश्वर भिसे,देविदास उराडे,मंडल अधिकारी मंगेश धवन,तलाठी निर्मळ,राजेंद्र खापरे,नवनाथ ढेरंगे,ज्ञानेश्वर खकाळे,दत्तु खकाळे,सोमनाथ भालनुर,भाऊसाहेब भालनुर,दत्तु साप्ते उपसस्थीत होते. कार्यक्र माचे सुत्रसंचालन ग्रामसेवक देवचंद शिदे यांनी केले.
-------------------
यावर्षी येवला तालुक्यातील १०० पाझर तलावातील गाळ काढण्याचे उद्दीष्ठ असुन ३५ पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर असुन लोकहीताची कामे असल्याने शेतकरी वर्गाने आपसातील मतभेद बाजुला ठेउन सहकार्य करावे.
भिमराज दराडे, उपविभागीय अधिकारी