सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप

By धनंजय रिसोडकर | Published: May 14, 2024 04:08 PM2024-05-14T16:08:13+5:302024-05-14T16:08:53+5:30

गत अडीच वर्षांत केलेल्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्यांची चौकशी लावणार

Loksabha Election - Allocation of 2 thousand crores in the state by the rulers; Serious accusation of MLA Rohit Pawar | सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप

सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप

नाशिक : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह सत्ताधारी गटाच्या पक्षांकडून पैशाचे अमाप वाटप होत असून नेते, गुंड आणि मते विकत घेण्यासाठी त्यांनी आतापर्यंत २ हजार कोटी खर्च करत आहेत. तर गत अडीच वर्षांत राज्य शासनाने तब्बल २५ हजार कोटींचे घोटाळे केले असून आमची सत्ता आल्यानंतर त्या सगळ्या पैशांची चौकशी करण्यात येणार आहेे. पैसे वाटपासाठी सत्ताधाऱ्यांनी हेलिकॉप्टरच नव्हे, वाय आणि झेड सिक्युरिटीतल्या गाड्या, टँकर्स तसेच ॲम्ब्युलन्सचादेखील वापर केला असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (दि. १४) पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना पवार यांनी मतदार मात्र अशा प्रकारांना मतदानातूनच उत्तर देणार असल्याचे सांगितलेे. राज्यात महाविकास आघाडीचा जोर असून महायुतीला केवळ १८ जागा मिळतील. त्यात भाजपला १३, शिंदे गटाला ३, तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचा दावादेखील पवार यांनी केला. अनेक ठिकाणी ‘इव्हीएम’ बंद, मशीन चेकिंगसाठी लावलेले सीसीटीव्ही बंद असे प्रकार झाले आहेत.

नाशिकला ८०० कोटींचा, धाराशिवला ४५०० कोटींचा, कोल्हापुरात २०० कोटींचा असे राज्यभरात गत अडीत वर्षांत २५ हजार कोटींचे घोटाळे झाल्याचेही त्यांनी नमूद केले. शेतकरी आणि मराठी माणूसच भाजपसह सत्ताधारी सर्व पक्षांना धडा शिकवणार आहे. सामान्यांचा नव्हे, तर केवळ पैसा, कमिशन आणि कंत्राट याचाच विचार राज्यकर्त्यांनी केला असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, माजी आमदार मारुतीराव पवार, गोकुळ पिंगळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Loksabha Election - Allocation of 2 thousand crores in the state by the rulers; Serious accusation of MLA Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.