उन्मळून पडलेल्या वृक्षाची शोकसभा

By Admin | Published: August 6, 2016 12:42 AM2016-08-06T00:42:21+5:302016-08-06T00:43:04+5:30

असाही निषेध : पर्यावरणप्रेमी वेधणार लक्ष

Lollipop | उन्मळून पडलेल्या वृक्षाची शोकसभा

उन्मळून पडलेल्या वृक्षाची शोकसभा

googlenewsNext

नाशिक : काळाराम मंदिराजवळील तो वटवृक्ष खऱ्या अर्थाने आधारवड होता. अनेक दशकांचा साक्षीदार होता. परंतु दोन दिवसांपूर्वी तो कोसळला आणि परिसरातील नागरिकही हळहळले. आता याच वृक्षाला शनिवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून, त्यानिमित्ताने सारे पर्यावरणप्रेमी लक्ष वेधणार आहेत.
गेल्या बुधवारी सायंकाळच्या सुमारास शंभर वर्षांचे जुने वडाचे झाड पावसाने कोसळले. त्याखाली तीन नागरिक अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आणि नंतर वृक्षाची छाटणी करण्यात आली. वास्तविक हा वृक्ष म्हणजे पंचवटीची खरी ओळख होती. याठिकाणी मोजक्या असलेल्या वडाच्या झाडांपैकी एक होते. मात्र, विकासाच्या नावाखालील कृत्रिमता आणि व्यावसायिकता त्याच्या लयाला कारणीभूत ठरली. या वृक्षाच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण तसेच त्यावर खिळे ठोकून लावण्यात आलेले व्यावसायिक फलक हेही कमी म्हणून वृक्षाच्या भोवती महापालिकेने पेव्हरब्लॉक टाकून बंदिस्त केल्याने या वृक्षाचे पोषण होऊ शकले नाही. इतकेच नव्हे तर पारंब्या जमिनीपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. परिणामी आणखी किमान पन्नास वर्ष जो वृक्ष टिकून राहिला असता तो अकाली धारातीर्थी पडला. शहरात असे अनेक वृक्षांच्या बाबतीत सुरू असून झाडांच्या बुंध्याभोवती डांबरीकरण आणि पेव्हरब्लॉक बसवले जात आहेत. तसेच खिळे ठोकण्यात येत आहेत.
पंचवटीची ओळख असलेल्या या एका वृक्षाच्या निमित्ताने शहरातील अन्य वृक्षांच्या अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी (दि. ६) दुपारी चार वाजता श्री काळाराम मंदिराजवळ शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरणप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन नेचर क्लबचे अध्यक्ष आनंद बोरा, नरेश पुजारी, निशिकांत पगारे यांनी केले आहे.

Web Title: Lollipop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.