लोणजाईमाता दिंडीसोहळा
By admin | Published: February 2, 2016 10:33 PM2016-02-02T22:33:03+5:302016-02-02T22:33:29+5:30
लोणजाईमाता दिंडीसोहळा
विंचूर : येथील विंचूर ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याला येथून रविवारी प्रारंभ झाला. या लोणजाईमाता दिंडीसोहळ्याला येथील मारुती मंदिरात पूजा करून प्रारंभ झाला. माडसांगवीमार्गे नाशिक शहरात पोहचलेली ही दिंडी मंगळवारी पंचवटीतील गणेशवाडी येथून त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाली.
औरंगाबाद रस्त्यावरील श्री संत जनार्दनस्वामी आश्रमात सकाळी दर्शन घेऊन या दिंडीतील भाविक गणेशवाडीकडे रवाना झाले. या ठिकाणी हर्षल माळी, सुनंदा माळी, दमयंती माळी, अलका शिंदे, रत्नमाला शिंदे, पोपटराव शिंदे, दत्तू शिंदे, जगन्नाथ माळी आदिंनी या दिंडीचे स्वागत केले.
सोहळा यशस्वीतेसाठी श्रीराम राऊत, पांडुरंग कानडे, प्रणव दरेकर, सागर घुमरे, किरण राऊत, माणिक महाराज शास्त्री, पोपटराव जाधव, अनिल कानडे, कांतीलाल ढवण, मुकुं द दाभाडे, ज्ञानेश्वर जाधव आदि परिश्रम घेत आहेत. पिंपळगाव बहुला येथील सुदाम भावले यांच्याकडे मंगळवारी ही दिंडी मुक्कामी राहणार आहे, तर खंबाळे येथे बुधवारी दुपारी महाले वस्तीवर ही दिंंडी महाप्रसाद घेण्यासाठी थांबणार आहे.
दरम्यान, त्र्यंबक रोडवरील मायको सर्कलवर असलेल्या मंडलिक हॉटेल परिसरात या दिंडीतील भाविकांनी दुपारचा चहा घेऊन पिंपळगाव बहुलाकडे प्रयाण केले. टाळ-मृदंगाच्या गजरात भजन करीत दिंडीचा प्रवास सुरू आहे. (वार्ताहर)