एकतानगरात हाणामारी
By admin | Published: August 29, 2016 01:40 AM2016-08-29T01:40:32+5:302016-08-29T01:43:25+5:30
एकतानगरात हाणामारी
मालेगाव : घर बांधण्यासाठी उसनवार घेतलेल्या २५ हजार रुपयांच्या कारणावरून श्रीरामनगरजवळील एकतानगर गवळीवाड्यात सासू-जावई यांच्यात हाणामारी झाली. शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी कॅम्प पोलिसांत दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मीना अनिल धोंडगे (४०) यांनी फिर्याद दिली. मीना व आरोपी प्रवीण अशोक पवार नात्याने सासू-जावई असून, सासूकडे घर बांधण्यासाठी २५ हजार रुपये उसनवार घेतल्याच्या कारणावरून विनोद अशोक पवार, सचिन अशोक पवार, शशी अशोक पवार, अजय अशोक पवार, श्रीकांत पवार, माया सचिन पवार, सुमन अशोक पवार, मनीषा श्रीकांत पवार, विजय अशोक पवार, अशोक राजाराम
पवार या
दहा जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून अनधिकाराने मीना धोंडगे यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करीत घरातील संसारोपयोगी वस्तूंची तोडफोड केली. त्यांच्या मुलींना मारहाण करून तुम्ही इथे कसे राहतात, अशी धमकी दिली. सचिन व प्रवीण पवार या दोघांना अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक तिगोटे करीत आहेत. (प्रतिनिधी)