किसानसभेच्या लाँग मार्चची मुंबईच्या दिशेने आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:05 PM2019-02-21T12:05:07+5:302019-02-21T12:13:46+5:30
एकचा नारा, सातबारा कोरो, दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आदी प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो शेतकरी, आदीवासी लॉंग मार्च करीत नाशकातून मुंबईच्या दिशेने आगेकुच करीत निघाले आहे.
नाशिक - एकचा नारा, सातबारा कोरो, दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आदी प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो शेतकरी, आदीवासी लॉंग मार्च करीत नाशकातून मुंबईच्या दिशेने आगेकुच करीत निघाले आहे.
शेतकऱ्याच्या व आदीवासींच्या प्रश्नावर बुधवारी (दि.२०) दिवसभरात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने शेतकरी, आदिवासी नाशिक मुक्कामी आले होते. त्यामुळे पुढील परीस्थितीचे गांभीर्य ओळखून शासकीय विश्रामगृहातील शिवनेरी दालनात जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, आमदार जिवा पांडू गावित, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या शिष्टमंडळाने तब्बल अडीच तास चर्चा केली. पंरुतु, तोडगा निघू न शकल्याने रात्री पुन्हा दीड तास चर्चा झाली, परंतु, ही चर्चा निष्फळ झाल्याने गुरुवारी (दि.२०) सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारेस नाशिकवरून मुंबईच्या दिशेने ‘लॉँग मार्च’ चा सरुवात झाली. प्रथम मोर्चेकऱ्यांची वाहने पुढे निघाल्यानंतर पाठीमागून एकामागून एक शेतकऱ्यांची पाऊले निघूल लागल्याने संपूर्ण मुंबईनाका परिसारत लाल वादळ घोंगावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, मोर्चाकऱ्यांमुळे मुंबईनाका परिसरात वाहतूकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याने बारावीच्या परीक्षेचा परिलाच पेपर देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात हाल झाले. पोलिसांनी चोख बंदोबस्त राखत ठराविक अंतराने वाहतुकीला रस्ता करून दिल्याने परीक्षार्थींना दिलासा मिळाला.
दरम्यान. किसान सभेच्या या मोर्चात नाशिकचे माजी खासदार समीर भूजबळ यांच्यासह माजी आमदार नितीन भोसले, जयंत जाधव, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. त्यांनी इंदिरानगरपर्यंत लाँगमार्चमध्ये सहभाग घेतला. मुंबई नाका परिसरातून निघालेला मोर्चा पाथर्डी फाटा परिसरात पोहचला असता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याने येथे काहीकाळ मोर्चा थांबल्यानंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार आहे.