तंबाखू सेवनामुळे दूरगामी परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:27+5:302021-02-06T04:23:27+5:30
पाटणे: मालेगाव कॅम्पातील केबीएच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त डॉ.तवरेज बागवान यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी ...
पाटणे: मालेगाव कॅम्पातील केबीएच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त डॉ.तवरेज बागवान यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल पवार होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य सुनील बागुल , उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, पर्यवेक्षक विलास पगार ,संतोष सावंत ,निवृत्ती निकम, डॉ . बागवान तबरेज, डॉ. विलास लोधे समाजसेवा अधिक्षक, डॉ.नागनाथ रोकडे समुपदेशक सिव्हिल हॉस्पिटल मालेगाव ,राजेंद्र शेवाळे, नितीन गवळी, कैलास देवरे ,एन.जी.गर्दे, सचिन लिंगायत उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. तंबाखू सेवनामुळे मानसिक, कौटुंबिक, सामाजिक व आर्थिक असे दूरगामी परिणाम भोगावे लागतात. युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकली आहे ही मोठी शोकांतिका आहे असे प्रतिपादन डॉ. तवरेज बागवान यांनी केले. कर्करोगाची स्त्री पुरुषांमध्ये आढळणारी लक्षणे, धूम्रपानाचे सौम्य व घातक परिणाम , आपली स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची कशी काळजी घ्यावी.सर्वच व्यसनांपासून दूर राहावे यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. धूम्रपान बंदी विभागाचे प्रमुख नितीन गवळी यांनी तंबाखू मुक्तीचा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रूजवण्यासाठी तंबाखू मुक्तीची शपथ दिली. यावेळी शशिकांत पवार, अनिल वाघ, नानाभाऊ शिरोळे, प्रवीण पाटील, सुनील सूर्यवंशी,कला शिक्षक जयदीप शेवाळे, नितीन पवार ,वामन शिंदे,आण्णा आहिरे उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले. आभार कैलास देवरे यांनी मानले.