नाशिकच्या पूर्व भागात शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 11:02 AM2018-07-06T11:02:23+5:302018-07-06T11:03:48+5:30
शेतकरी वर्ग पावसाच्या पुनरागमनाने सुखावला आहे
नाशिक/एकलहरे : नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी या परिसरातील गावांमध्ये मंगळवार दुपारपासून सुरू झालेल्या पावसाच्या रिपरिपीमुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला सुरुवात केली असून, शेतकरी वर्ग पावसाच्या पुनरागमनाने सुखावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे आर्द्रा नक्षत्र कोरडेच जाते की काय या भीतीपोटी सोयाबीन पेरणी करण्यास शेतकºयांच्या मनात चलबिचल सुरू होती. मात्र मंगळवारच्या रिपरिप पावसामुळे शेतात बºयापैकी ओल निर्माण झाल्याने शेतकºयांनी सोयाबीन पेरण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे ज्या शेतकºयांच्या डाळिंबाच्या बागा आहेत त्यांनी डाळिंबाच्या झाडाच्या बुडाजवळ उगवलेल्या जास्तीच्या अनावश्यक फांद्यांची छाटणी सुरू केली आहे. या छाटणीमुळे सध्या लागलेला फळबहार जोमाने वाढून त्यातील बियांमध्ये रसनिष्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. एकूणच नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. ज्या शेतकºयांचे कोबी, फ्लॉवर काढून रिकाम्या असलेल्या शेतात खत तयार करण्यासाठी मेढपाळांनी आपले तळ ठोकले आहेत. दिवसभर मेंढपाळ मेंढ्या चारून झाल्यावर रात्री शेतात ठोकलेल्या वाड्यात मेंढ्या बसवून मुक्काम ठोकतात. मेंढ्यांच्या मलमूत्रामुळे शेतात खत साठवले जाते. दिवसागणिक मेढ्यांचा मुक्काम पुढे सरकत असतो. हे मेंढपाळ संगमनेर परिसरातून आले असून, नाशिक तालुका पूर्व भागातला दौरा आटोपला की, मखमलाबादला मुक्काम ठोकणार असल्याचे एका मेंढपाळाने सांगितले.