ग्रामीण भागात लोणचे बनविण्यासाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 04:10 PM2019-06-18T16:10:44+5:302019-06-18T16:11:01+5:30

चिनीमातीच्या बरण्यांना मागणी : कैरीचा भाव २५० रुपये शेकडा

Long time to make pickles in the rural areas | ग्रामीण भागात लोणचे बनविण्यासाठी लगबग

ग्रामीण भागात लोणचे बनविण्यासाठी लगबग

Next
ठळक मुद्देमान्सूनपूर्व पावसाने परिसरात रिमझिम हजेरी लावल्याने लोणच्यासाठी लागणा-या कै-या घेण्यास नागरिकांनी सुरूवात केली आहे.

खमताणे : साधारणपणे जून महिन्यात पहिला पाऊस पडला की ग्रामीण भागात घरोघरी लोणच्याचा सुवास दरवळयाला लागतो. अद्याप अपेक्षित पाऊस पडला नसला तरी घराघरांत गृहिणींची मात्र लोणचे तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. लोणच्यासाठी बाजारात कैऱ्या दाखल होत असून २५० ते ३५० रुपये शेकडा दराने विक्री होत आहे तर लोणचे साठविण्यासाठी चिनी मातीच्या बरण्यांनाही मागणी वाढली आहे.
लोणच्यासाठी लागणारी कैरी घेण्यासाठी बाजारपेठेत सध्या महिलांची गर्दी दिसू लागली आहे. मान्सूनपूर्व पावसाने परिसरात रिमझिम हजेरी लावल्याने लोणच्यासाठी लागणा-या कै-या घेण्यास नागरिकांनी सुरूवात केली आहे. यंदा कैऱ्यांची आवक कमी प्रमाणात आहे. साधारणपणे २५० ते ३५० रुपये शेकडा या भावाने कै-यांची विक्र  होत आहे. लोणच्यासाठी लागणारे मसाल्याचे पदार्थही यंदा महागले आहेत . अतिशय दळदार आणि बाहेरून काळपट हिरवी ; परंतु आतून पांढरी शुभ्र, अशा कैरीला बाजारात मोठी मागणी आहे. ग्रामीण भागासह गुजरात राज्यातील सौराष्टतील लोणच्याच्या कैरीला मोठी मागणी आहे. बाजारातून कैरी विकत घेऊन त्या घरी स्वच्छ पाण्यात टाकली जातात. मग ती कैरी दुस-या दिवशी सकाळी धुऊन व पुसुन फोडली जाते. चमचमीत मसाला टाकून लोणचे तयार केले जाते. . त्याचप्रमाणे हे लोणचे टाकण्यासाठी लागणा-या चिनी मातीच्या बरणीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली. कैरी लोणच्यासोबतच लिंबु, आवळा, हिरवी मिरची आदींचेहे लोणचे टाकण्यात महिलांची लगबग सुरू आहे. पुर्वी मातीपासून तयार केलेल्या खा-यांमध्ये लोणचे भरले जायचे. मात्र, आता हळूहळू तो हद्दपार झाला आहे. स्थानिक व्यापा-यांनी हैदराबाद व गुजरात येथुन बरण्या मागविल्या आहेत. हे लोणचे दीर्घकाळ टिकते. ते बनविण्याचीही पूर्वापार एक पद्धत आहे. त्या पद्धतीताच अवलंब करून गृहिणी लोणचे बनविण्याचे काम करीत असतात.

Web Title: Long time to make pickles in the rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.