खामखेडा परिसरात कांद्याच्या बियाणे टाकण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 04:18 PM2018-09-29T16:18:49+5:302018-09-29T16:19:48+5:30

खामखेडा : खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याच्या बियाणे टाकन्यासाठी शेतकर्याची मोठया प्रमाणात लगभग सुरु असल्याचे चित्र शिवारात पाहावयास मिळत आहे.

Long time to put onion seed in Khamkhheda area | खामखेडा परिसरात कांद्याच्या बियाणे टाकण्याची लगबग

खामखेडा परिसरात कांद्याच्या बियाणे टाकण्याची लगबग

Next
ठळक मुद्देकापणी झाल्यावर या ठिकाणी उन्हाळी कांद्याची लागवड करणार

खामखेडा : खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याच्या बियाणे टाकन्यासाठी शेतकर्याची मोठया प्रमाणात लगभग सुरु असल्याचे चित्र शिवारात पाहावयास मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यात कसमादे भागातील गिरणा नदी काठावरील गावामघ्ये मोठया प्रमाणात उन्हाळी कांद्याची मोठया प्रमाणात लागवड केली जाते. कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. पूर्वी बागायती शेती कमी असल्याने अगदी बोटावर मोजता येतील एवढे शेतकरी कांद्याची लागवड करीत असे. त्यामुळे या भागामघ्ये जिरायती जमिनीत बाजरी, ज्वारी, मका, भुईमूग, तूर, कुळीद आदी पिके घेतली जात असे. मात्र विज्ञानाची प्रगती होऊन शेती तयार करण्यासाठी अंत्यत आधुनिक साधने उपलब्ध झाली. जमिनीच्या सपाटीकरणासाठी ट्रकटर, जेसीबी सारखे मशिनरी उपलब्ध झाल्याने उंच खोलभागाचे सपाटीकरण झाल.
धरणे, बंधारे बांधून पावसाळ्याच्या दिवसात वाहून जाणारे पाणी धरणे,नालाबांध याचा अडविले गेल्याने जमिनीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन विहिरींची संख्या वाढल्या. तसेच ठिबक सिंचन, तुषार सिंचन याचा अवलंब शेतकरी करू लागल्याने कमी पाण्यामघ्ये पिके येऊ लागल्याने बागायती क्षेत्रात वाढ झाल्याने शेतकरी उन्हाळी कांदा पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. जो माणूस दुसर्याकडे कामाला जात होता तो शेतकरी झाल्याने बागायती जमीन वाढली. आता सर्वसधारण शेतकरी किमान तीनशे-ते चारशे क्विंटल पिकवत आहे. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
शेतकरयाने खिरपातील बाजरी,मका,भुईमूग, आदी पिकाची पेरणी केली आहे. यावर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस न झाल्याने जमिनीच्या पाण्याच्या पातळीत पाहिजे त्याप्रमाणात वाढ झालेली दिसून येत नाही. या वर्षी परतीच्या पाऊसानेही हुकवणी दिली आहे. आज ना उद्या पाऊस पडेल आण विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल किंवा लवकर उन्हाळी कांद्याची लागवड केली म्हणजे पुढे पाण्याची ताण पडणार नाही असे शेतकर्याच्या बोलण्यातून व्यक्त होतांना दिसून येत आहे. या पिकाची कापणी आता सुरवात होणार आहे. आण या पिकाची कापणी झाल्यावर या ठिकाणी उन्हाळी कांद्याची लागवड करणार आहे.उन्हाळी कांद्याची लागवड साधारण नोव्हबर मिहन्यात सुरवात करतो. तेव्हा कांद्याचे बियाणे लागवडीसाठी लवकर आले पाहिजे म्हणून शिवारात सर्वत्र शेतकरी उन्हाळी कांद्याचे बियाणे टाकतांना दिसून येत आहे.

Web Title: Long time to put onion seed in Khamkhheda area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक