मित्रपक्षांच्या फाटाफुटीवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:44 AM2019-10-13T00:44:45+5:302019-10-13T00:46:09+5:30

शहरातील चारही मतदारसंघात युती आणि आघाडीचे उमेदवार रिंगणात असले तरी सर्वच पक्षांची नजर ही मित्रपक्षांच्या फाटाफुटीवर आहे, काही मतदारसंघात स्पर्धक उमेदवाराच्या पक्षांतर्गत नाराजीदेखील पथ्यावर पाडून घेण्याची स्पर्धा सुरू आहे.

 Look at the breakup of friends | मित्रपक्षांच्या फाटाफुटीवर नजर

मित्रपक्षांच्या फाटाफुटीवर नजर

Next
ठळक मुद्देव्यूहरचना ; शहरी मतदारसंघातील राजकारणाला वेगळे वळण

नाशिक : शहरातील चारही मतदारसंघात युती आणि आघाडीचे उमेदवार रिंगणात असले तरी सर्वच पक्षांची नजर ही मित्रपक्षांच्या फाटाफुटीवर आहे, काही मतदारसंघात स्पर्धक उमेदवाराच्या पक्षांतर्गत नाराजीदेखील पथ्यावर पाडून घेण्याची स्पर्धा सुरू आहे.
नाशिक शहरात चार मतदारसंघ आहेत. देवळाली मतदारसंघात शिवसेना आणि राष्टÑवादी कॉँग्रेस यांच्यात लढत आहे, तर नाशिक पूर्वमध्येदेखील भाजप आणि राष्टÑवादीत लढत आहे. नाशिक मध्य मतदारसंघात तिरंगी लढत आहे, तर पश्चिम नाशिक मध्य चौरंगी लढत असल्याचे सकृत दर्शनी दिसते आहे. नाशिक पूर्वमध्ये यंदा सर्वाधिक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपच्या आमदाराचे तिकीट कापून ते मनसेतून ऐनवेळी आलेल्या उमेदवारास देण्यात आले तर भाजपचे आमदाराने मग राजीनामा देऊन तातडीने राष्टÑवादीचे घड्याळ हातावर बांधले. या घडामोडीत राष्टÑवादीच्या प्रयत्नातून मनसेच्या उमेदवाराने माघार घेतल्याची चर्चा असली तरी आघाडीची बिघाडी ठेवण्यात भाजपला यश आल्याचे सांगितले जात आहे. आघाडीत ही जागा कॉँग्रेसच्या वाट्याला आली असल्याने त्यांनी कवाडे गटाला सोडली होती. ऐनवेळी राष्टÑवादी कॉँग्रेसने उमेदवार उभे केल्यानंतर कवाडे गटाच्या उमेदवाराने माघार घेण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. अर्थात त्यामागे भाजपची खेळी असून, कॉँग्रेस आणि राष्टÑवादीत फूट पाडण्याची खेळी यशस्वी झाल्याचे दिसते आहे.

नाराजी कॅश करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न
देवळाली मतदारसंघात शिवसेना उमेदवाराला राष्टÑवादीने चांगले आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. तीस वर्षे एकाच घराण्यातील उमेदवार दिल्याने त्याविषयी अलीकडे उमटू लागलेली नाराजी कॅश करण्याचा राष्टÑवादीचा प्रयत्न आहे. विशेषत या मतदारसंघातील भाजपतील मैत्रीचा लाभ घेऊन मते मिळवण्याचा प्रयत्न पूर्वाश्रमीच्या भाजपच्या असलेल्या राष्टÑवादीच्या उमेदवाराने चालविला आहे, तर ऐनवेळी राष्टÑवादीने बाहेरून आलेल्या उमेदवाराला संधी दिली हेच निमित्त करून शिवसेनादेखील ही नाराजी पथ्यावर पाडून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत.
मध्य नाशिक मतदारसंघात भाजपतील प्रबळ दावेदाराची संधी हुकल्यानंतर त्यांनी नाराजी कॅश करण्यासाठी कॉॅँग्रेस प्रयत्न करत असताना काँग्रेस उमेदवाराच्या विरोधातील गट मात्र मनसे किंवा भाजपच्या पथ्यावर पडणारा ठरू शकतो, असे विचार करून त्या दृष्टीनेच हालचालीदेखील सुरू आहे. मुळातच काँग्रेसमध्ये हा वाद खेळता राहील याची भाजपने दक्षता घेतली आहेच शिवाय राष्टÑवादीच्या डावलेल्या इच्छुकाकडूनदेखील रसद पुरवठा करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.

Web Title:  Look at the breakup of friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.