पाळीव श्वानांवर नजर

By admin | Published: May 18, 2017 12:49 AM2017-05-18T00:49:15+5:302017-05-18T00:49:38+5:30

निर्बीजीकरण : सनदी अधिकाऱ्याच्या श्वानाची कहाणीमोकाट वाऱ्यावर,

Look at pet dogs | पाळीव श्वानांवर नजर

पाळीव श्वानांवर नजर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या मंगळवारी (दि. १६) महापौरांनी गोदाघाटावर भेट दिली त्यावेळी त्यांना परिसरातील एकाही श्वानाचे निर्बीजीकरण झालेले नसल्याचे निदर्शनास आले होते. भटके व मोकाट श्वान वाऱ्यावर सोडून देत ठेकेदाराकडून पाळीव श्वानांना लक्ष्य केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, त्याचा अनुभव एका उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्याला आला आहे. महापालिकेमार्फत भटक्या व मोकाट श्वानांवर नियंत्रण आणण्यासाठी निर्बीजीकरणाच्या माध्यमातून उपाययोजना केली जाते. त्यासाठी महापालिकेने ९० लाख रुपयांचा वार्षिक ठेकाही दिला आहे. सदर ठेकेदाराने मोकाट व भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करणे अपेक्षित आहे. दरवर्षी सुमारे ६ हजार श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. महापालिकेमार्फत निर्बीजीकरणासाठी स्वतंत्र ठेका दिला जात असतानाही मोकाट व भटक्या श्वानांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत नाही. आता तर भटक्या व मोकाट श्वानांवर नजर ठेवण्याऐवजी संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून पाळीव श्वानांना लक्ष्य केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. पंधरा दिवसांपूर्वीची घटना आहे. शहरातील एका उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्याच्या निवासस्थानी गोल्डन रिट्रीवर जातीचे पाळीव श्वान आहे. अधिकाऱ्याच्या बंगल्यावरील सेवकाने रात्री ९ वाजेच्या सुमारास श्वानास बाहेर फिरविण्यासाठी आणले असता, ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी सेवकास दम भरत श्वानाचे निर्बीजीकरण करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. सेवकाने घाबरून मालकाला दूरध्वनीद्वारे कल्पना दिली आणि श्वानाची ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांपासून मुक्तता करून घेतली. या प्रकारामुळे श्वान निर्बीजीकरणाच्या ठेक्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुळात घरगुती पाळीव श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी सदर ठेका दिलेला नाही. त्यामुळे ठेकेदाराचे जे कुणी कर्मचारी पाळीव श्वानांनाही लक्ष्य करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. निर्बीजीकरणाची मोहीम ही प्रामुख्याने, सकाळच्या सुमारास राबविली जाते. श्वानमालकांनी पाळीव श्वानांची नोंदणी करणे अपेक्षित आहे.
- डॉ. प्रमोद सोनवणे
पशुवैद्यकीय अधिकारी, मनपा

Web Title: Look at pet dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.