युतीमुळे सिन्नरच्या राजकारणाकडे नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:39 PM2019-02-19T22:39:07+5:302019-02-19T22:43:22+5:30

सिन्नर : शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला शिवसेना - भाजपा युती होण्यावर शिक्कामोर्तब झाले आणि जिल्ह्यासह सिन्नरच्या राजकारणावर त्याचे पडसाद उमटू लागले. राजकारणात अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सिन्नरकडे युतीच्या निर्णयामुळे सर्वांच्याच नजरा खिळल्या. सेना-भाजपा युतीच्या निर्णयामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे काहीसे निवांत तर गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर उमेदवारी करणारे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची मात्र राजकीय कोंडी झाल्याचे चित्र आहे.

Look at Sinnar's politics by the alliance | युतीमुळे सिन्नरच्या राजकारणाकडे नजरा

आमदार राजाभाऊ वाजे

Next
ठळक मुद्देपडसाद : माणिकराव कोकाटे यांची कोंडी, तर राजाभाऊ वाजे निवांत

शैलेश कर्पे ।
सिन्नर : शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला शिवसेना - भाजपा युती होण्यावर शिक्कामोर्तब झाले आणि जिल्ह्यासह सिन्नरच्या राजकारणावर त्याचे पडसाद उमटू लागले. राजकारणात अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सिन्नरकडे युतीच्या निर्णयामुळे सर्वांच्याच नजरा खिळल्या. सेना-भाजपा युतीच्या निर्णयामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे काहीसे निवांत तर गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर उमेदवारी करणारे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची मात्र राजकीय कोंडी झाल्याचे चित्र आहे.
सिन्नरचे राजकारण पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रित असल्याचे अनेक निवडणुकांतून सिद्ध झाले आहे. असे असले तरी गेल्या साडेचार वर्षात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या शिवसेना पक्षात व माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या भाजपा उमेदवारांमध्ये येथील स्थानिक निवडणुका रंगल्याचे दिसून आले. गेली विधानसभेची निवडणुकीत सेना-भाजपामध्ये वाजे-कोकाटे यांच्यात दुरंगी झाली होती. त्यामुळे होऊ घातलेली निवडणूकही वाजे-कोकाटे यांच्यात होईल अशीच चिन्हे आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी सेना-भाजपा यांच्यात युती झाली. त्याचे पडसाद सिन्नरच्या राजकारणावर उमटले नाही तरच नवल.
गेल्या अनेक विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला युतीच्या जागावाटपात सिन्नरची विधानसभेची जागा शिवसेनेकडे आहे. गेल्यावेळी युती न झाल्याने सेना-भाजपात दुरंगी लढत झाली होती. त्यात सेनेचे उमेदवार वाजे यांनी भाजपाचे उमेदवार कोकाटे यांचा पराभव केला होता. यापूर्वीही
सिन्नरची जागा शिवसेनेची होती आणि गेल्या निवडणुकीतही शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला होता. त्यामुळे युतीच्या जागावाटपात सिन्नर विधानसभेची जागा शिवसेनेकडे राहील हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची अडचण झाली आहे, तर सिन्नरची जागा सेनेकडे राहील यामुळे वाजे निवांत झाले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत वाजे-कोकाटे एकत्र प्रचार करतात की अन्य काही घडते याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. आघाडीत जागा कुणाकडे ?विधानसभेची उमेदवारी करायची झाल्यास माजी आमदार कोकाटे यांना वेगळा निर्णय घ्यावा लागणार असल्याची चर्चा
आहे. सेना-भाजपाची युती होत असतानाच आघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आघाडीच्या जागावाटपात दहा
वर्षांपूर्वी सिन्नरची जागा कॉँग्रेसकडे देण्यात आली होती. यापूर्वी सिन्नरची जागा राष्टÑवादीकडे होती. मात्र नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये असलेल्या
कोकाटे यांच्यासाठी सिन्नरची जागा कॉँग्रेसला सोडण्यात आली होती. गेल्या निवडणुकीत कॉँग्रेस-राष्टÑवादी स्वतंत्र लढले होते. त्यामुळे या निवडणुकीत सिन्नरची जागा आघाडीत कोणाकडे जाते हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लोकसभा आणि विधानसभेसाठी भाजपाकडून जागा शिल्लक नसल्याने कोकाटे पक्षांतर करतील अशी चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. सिन्नर येथे गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटे यांना राष्ट्रवादीत येण्याचे जाहीर आमंत्रण दिले होते. त्यांनतर कोकाटे राष्ट्रवादीत जातील याची चर्चाही झडली. मात्र कोकाटे यांनी अजून आपली भूमिका जाहीर न केल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Look at Sinnar's politics by the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.