खाणमाफियांवर ठेवणार ‘ड्रोन’च्या माध्यमातून नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:03 AM2018-11-18T01:03:34+5:302018-11-18T01:03:52+5:30
मुंबई-आग्रा महामार्गाला लागूनच असलेल्या सारूळ व राजूर बहुला येथील खाणपट्ट्यातून होणारा दगडांचा वारेमाप उपसा व त्याआधारे चालविल्या जाणाºया बेकायदेशीर खडीक्रशरमधून होत असलेली गौणखनिजाची चोरी रोखण्यासाठी हरतºहेचे उपाय करूनही यश मिळत नसल्याचे पाहून अखेर ड्रोनच्या माध्यमातून सलग खाणपट्ट्यांवर नजर ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी तांत्रिक मंजुरीही देण्यात आली आहे.
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गाला लागूनच असलेल्या सारूळ व राजूर बहुला येथील खाणपट्ट्यातून होणारा दगडांचा वारेमाप उपसा व त्याआधारे चालविल्या जाणाºया बेकायदेशीर खडीक्रशरमधून होत असलेली गौणखनिजाची चोरी रोखण्यासाठी हरतºहेचे उपाय करूनही यश मिळत नसल्याचे पाहून अखेर ड्रोनच्या माध्यमातून सलग खाणपट्ट्यांवर नजर ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी तांत्रिक मंजुरीही देण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात गौणखनिजाची होत असलेली चोरी महसूल खात्याची डोकेदुखी ठरली असून, गौणखनिज माफियांविरुद्ध वेळोवेळी कारवाया करूनही त्याला अटकाव बसत नसल्याचे सिद्ध झाले आहे किंबहुना माफियांकडून महसूल अधिकारी, कर्मचाºयांवर हल्ले करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. जिल्ह्यातील वाळू लिलाव बंद असतानाही वाळूची होणारी चोरी-छुपी वाहतूक, दगड, मुरूम, माती, खडीचा होणारा अनधिकृत उपसा पाहता, त्याला आळा घालण्याचे अनेकविध प्रयत्न करण्यात आले, परंतु त्याला पूर्णत: रोखण्यात अपयश आले आहे. नाशिक तालुक्यातील राजूर बहुला व सारूळ शिवारात अशा प्रकारच्या सुमारे २५ ते ३० बेकायदेशीर दगड खाणी असून, या खाणमाफियांनी अख्खा डोंगर गिळंकृत करून भूसुरुंगाचा वापर करीत जमिनीखालून शेकडो फुटावरून वारेमाप दगडांचा उपसा केला आहे. त्यातून काहींना जीव गमवावा लागला तर गौणखनिजाच्या चोरीतून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविण्याबरोबरच, विजेच्या अनधिकृत जोडणीतून यंत्रसामग्री चालविली जात आहे. मुंबई महामार्गावरून सहजपणे नजरेस पडणाºया या खाणींमध्ये दिवस-रात्र उपसा केला जात असला तरी, कारवाईसाठी जाणाºया पथकाचा सुगावा लागताच, माफिया पलायन करीत असल्यामुळे पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागत आहे, शिवाय खाणींचा संपूर्ण परिसर जीविताच्या दृष्टीने असुरक्षित असल्यामुळे तेथे जाण्याचे धाडसदेखील करण्यास कोणी धजावत नसल्याची उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सारूळ व राजूर बहुला येथील खाणींवर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याचा निर्णय नाशिक तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी घेतला आहे. ड्रोनच्या माध्यमातून हव्या त्या ठिकाणची पाहिजे तेव्हा पाहणी करता येईल.
पुलांवर लावणार सीसीटीव्ही कॅमेरे
खाणमाफियांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेण्याबरोबरच, अन्य गौणखनिजाची शहरातून केल्या जाणाºया बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालण्यासाठी नाशिक शहरात प्रवेश करणाºया प्रमुख रस्त्यांवर व विशेषत: पंचवटीतील कन्नमवार पुलावर मालेगावकडून येणाºया वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा विचारही प्रशासनाने गांभीर्याने सुरू केला आहे. या कॅमेºयांच्या माध्यमातून गौणखनिजाच्या वाहतुकीला आळा घालण्यास मदत होणार आहे. पुलाजवळच त्यासाठी कंट्रोल रूम उभारण्याचाही प्रस्ताव आहे.