एक नजर लसीकरणावर... जिल्ह्यात केवळ ३ टक्के लसीकरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:11 AM2021-06-03T04:11:21+5:302021-06-03T04:11:21+5:30

नाशिक : जिल्ह्याला प्राप्त झालेल्या लसींमधून आतापर्यंत केवळ ३ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात सध्या ३४ हजार डोस ...

A look at vaccination ... only 3% vaccination in the district! | एक नजर लसीकरणावर... जिल्ह्यात केवळ ३ टक्के लसीकरण !

एक नजर लसीकरणावर... जिल्ह्यात केवळ ३ टक्के लसीकरण !

Next

नाशिक : जिल्ह्याला प्राप्त झालेल्या लसींमधून आतापर्यंत केवळ ३ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात सध्या ३४ हजार डोस उपलब्ध असले तरी लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने लसीकरणाला अपेक्षित गती मिळणे शक्य झालेले नाही. १६ जानेवारीला लसीकरणाला प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील ९ लाख ५६ हजार ६९ लस प्रदान करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातही दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या अवघी २ लाख ११ हजार ५५२ असून, केवळ पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ७ लाख ४४ हजार ५१७ आहे. नाशिक जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यास कोरोना लस मिळण्याचे प्रमाणदेखील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक होते. मात्र, प्रारंभीच्या टप्प्यात लसीकरणाचा वेग कमी तसेच लस वाया जाण्याचे प्रमाणदेखील अधिक होते, तर एप्रिल महिन्यापासून लस मिळण्यात सातत्याचा अभाव आल्यानेदेखील लसीकरणाची गती मंद झाली आहे. आतापर्यंत ४५ वर्षांवरील गटाचे लसीकरण सुमारे १० टक्के, तर एकूण लोकसंख्येपैकी केवळ ३ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

त्यामुळे जवळपास एक चतुर्थांश किंवा टक्केवारीत तब्बल २३.४ टक्के इतकी लस वाया गेल्याचे दिसून येत आहे.

नाशिक जिल्ह्याला करण्यात आलेल्या पुरवठ्यापैकी एकूण ८२ हजार ९२३ लस वाया गेल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून निष्पन्न झाले आहे.

इन्फो

वाया जाण्याबाबत संशय

त्याच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात लस वाया जात असल्याने नक्की लस वाया जाते की कुठेही नोंद न होता परस्पर कुणाला दिली जाते, याबाबत दबक्या आवाजात संशय व्यक्त केला जात आहे.

-----------------------------------------------------

पहिला डोस आरोग्य - १४१२४९

पहिला डोस ४५ ते ६० - ३२४४६०

पहिला डोस ६० वरील - २६४४९५

पहिला डोस १८ ते ४४ - १४३१३

दुसरा डोस आरोग्य - ६२१४८

दुसरा डोस ४५ ते ६० - ७००२२

दुसरा डोस ६० वरील - ७९२५९

दुसरा डोस १८ ते ४४ - १२३

--------------------

डोस शिल्लक ३४ हजार

त्यात कोव्हॅक्सिन ८ हजार , कोविशिल्ड २६ हजार

११०९७०/ ८८६०९०

कोव्हॅक्सिन / कोविशिल्ड

वाया जाण्याचे प्रमाण -०.८ टक्के

-----------------

Web Title: A look at vaccination ... only 3% vaccination in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.